आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या 'त्या' दोन्ही मित्रांवर आज होणार अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गोवा येथील समुद्रात बुडालेल्या तसेच मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अकोला येथील शुभम वैद्य व किरण मस्के या युवकांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता अकोल्यासाठी रवाना करण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांचे मृतदेह पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
 
शनिवारी अकोल्याहून १४ मित्रांचा ग्रुप गोवा पर्यटनासाठी रेल्वेने निघाला होता. ते सोमवारी पहाटे ११ युवक गोवा येथील कळंगुट येथील समुद्रात आंघोळीसाठी गेले असता त्यातील पाच जणांना खवळलेल्या समुद्रात जलसमाधी मिळाली होती. तर सहा जण किनाऱ्यावर फेकल्या गेल्याने बचावले होते. त्यापैकी पाचपैकी तिघांचे मृतदेह मिळाले होते. तर शुभम वैद्य व किरण म्हस्के यांचे मृतदेह सापडले नव्हते. या दोघांचेही मृतदेह बुधवारी संध्याकाळी समुद्रात सापडले. गोवा येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता अकोल्यासाठी अॅम्ब्युलन्समधून रवाना झाले होते. अकोल्यात त्यांच्यावर शुक्रवारला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 
शनिवारचे होते युवकांचे परतीचे रिझर्व्हेशन 
युवकांचे अकोल्याहून गोव्याला जाण्याचे शनिवारचे आरक्षण होते. त्याचप्रमाणे त्यांनी गोव्याहून परतीचेही आरक्षण केलेले होते. मात्र परतीच्या प्रवासाला या युवकांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून येतील याचा विचारही कुणी केला नव्हता. 
 
किरण नोकरीसोबतच एमएपीएसीची तयारी 
किरण हा डेबुजी ब्रिगेडचा अकोला पूर्वचा महानगराध्यक्ष आहे. सोबतच तो पॉवर प्लॅटमध्ये नोकरी करीत असताना एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. त्याने आकाशवाणीमध्येही टेक्नीशएनचे काम केले होते. घरातही किरण सर्वांचा आवडता होता. आजपर्यंत किरणच्या मृत्यूची बातमी त्याच्या आईला सांगण्यात आली नाही. किरणचे वडील मात्र स्वत:ला सावरून त्याच्या आईला माहिती होणार नाही, याची काळजी घेताना दिसून येत होते. 

बातम्या आणखी आहेत...