आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिधोरा पुलावरून ट्रॅक्टर काेसळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाळापूर राेडवर असलेल्या रिधाेरा येथील पुलावरुन पाण्याचा ट्रॅक्टर काेसळल्याची घटना शनिवारी घडली. अजय घोगरे हे जखमी झाले. ग्रामस्थ अाणि वाहतूक शाखेच्या पाेलिसांनी धाव घेतल्याने ट्रॅक्टरखाली दबलेल्या चालकाला बाहेर काढण्यात अाले. शनिवारी एक ट्रॅक्टर पाणी भरुन रिधाेऱ्याकडे जात हाेता. पुलावर चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर काेसळला. घटनेची माहिती मिळताच रिधोरा पोलिस पाटील सुधीर देशमुख यांनी तातडीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेशी संपर्क साधला. ही माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चालकाला बाहेर काढण्यात अाले. यासाठी हैड्रोलीक क्रेनची मदत घेण्यात अाली. जखमीला रुग्णालयात भरती करण्यात अाले. अलीकडे या मार्गावर अपघात वाढले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...