आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ छत्री आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात महाराष्ट्रात आता कुठेही दारुबंदी करणार नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज १७ जुलै रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडीयमवर अस्तित्व महिला संघटनेच्या वतीने छत्री आंदोलन करण्यात आले. 


अस्तित्व महिला संघटना गेल्या पाच वर्षापासुन विविध आंदोलनाचे माध्यमातुन मातृतीर्थ व विदर्भ पंढरी बुलडाणा ज़िल्हा संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी करीत आहे. संपूर्ण जिल्ह्यामधे दारुबंदीची लोक चळवळ झाली असून अनेक संघटना व आमदारांचा पाठिंबा आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री कांबळे, आ. निलमताई गोरे यांच्या व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समावेत २७ नोव्हेंबर २०१५ रोजी मंत्रालयांमध्ये बैठक घेण्यात आली. तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री खडसे आणि ९ डिसेंबर २०१६ रोजी उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शविली होती. तसेच गेल्या अधिवेशनात आपणास भेटलो असता आपण स्वतः सुद्धा दारूविरोधी आहोत आणि अभ्यास करून निर्णय घेणे बद्दल बोलले. परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतला तर नाहीच परंतु उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली कि, चंद्रपूर नंतर महाराष्ट्रात कुठेच दारूबंदी करणार नाही असे म्हटले. 


ही भूमिका म्हणजे दारुबंदी आंदोलन आणि महिलांचा अपमान करणारे आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ अस्तित्व महिला संघटनेने छत्री आंदोलन केले. छत्री आंदोलनात अस्तित्व संघटनेच्या महिलांनी व इतर पुरुष सदस्यानी काळे कपडे परिधान करून व काळ्या छत्र्यांवर दारूविरोधी सरकारचे फलक लावून निषेध नोंदविला. या आंदोलनात प्रेमलता वाघ सोनोने, नर्मदा वानखडे, आरती तायडे, वृशाली किटूकले, पायल किटूकले, प्रकाश सोनोने, प्रितेश राघोर्टे, अक्षय जामोदे, मयूर होले, चेतन काले, प्रसाद सोनोने, गणेश सपकाळ सह आदी सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...