आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिजापूर न.प.उपाध्यक्ष, स्थायी सभापतींची बिनविरोध निवड; नवीन सभापतींचे स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- येथीलनगर परिषदेत उपाध्यक्ष, स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी जानेवारीला बिनविरोध निवडणूक झाली. उपाध्यक्षपदी आलीया तब्बसूम यांची बिनविरोध निवड केली. या पूर्वी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा कविता गुल्हाने यांच्या कारकिर्दीस एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने निवडणूक घेण्यात आली. विविध विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेतली. 


स्थायी समिती सभापती, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, सदस्य म्हणून आलीया तब्बसूम, मंदाताई जळमकर, प्रशांत डाबेराव, धनश्री भेलोंडे, सुनील पवार, लक्ष्मी गोडे, सचिन देशमुख , द्वारकाप्रसाद दुबे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती मंदाताई जळमकर, सदस्य सचिन देशमुख , ममता महाजन, अनिसा बी शेख खलील ,विनायक गुल्हाने, भरत जेठवानी , शिक्षण समिती सभापती सुनील पवार , सदस्य स्नेहा नाकट ,सरिता पाटील, द्वारकाप्रसाद दुबे , सुनीता गुल्हाने ,प्रतीक्षा वसुकार, पाणी पुरवठा सभापती धनश्री भेलोंडे ,सदस्य कविता गुल्हाने, अफरोजा बी , तस्लीम खान, नियोजन विकास समिती सभापती आलीया तब्बसूम, सदस्य सचिन देशमुख ,सरिता पाटील , आशिष बरे ,वैभव यादव ,भरत जेठवानी , महिला बालकल्याण समिती सभापती लक्ष्मी गोडे, उपसभापती अफरोजा बी,सदस्य स्नेहा नाकट , मनुबाई तानकर , प्रतिशा वसुकार , अनिसा बी, आरोग्य समिती सभापती प्रशांत डाबेराव ,सदस्य कविता गुल्हाने, स्नेहा नाकट,ममता महाजन, वैभव यादव ,आशिष बरे,यांची बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राहूल तायडे, सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर , नायब तहसीलदार उमेश बंसोड , प्रशासकीय प्रमुख जगदीश कुंभेकर,प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल यांनी काम पाहिले. या प्रसंगी कमलाकर गावंडे, राहुल गुल्हाने , संदीप जळमकर , ,गजानन नाकट, मोहन वसुकार ,राहुल पाटील , कैलास महाजन , रवि तिवारी, नारायण खडसे , नितीन शिंगणे आदी उपस्थित होते. 


विविध विषय सभापतींची निवड 
पातूर।
नगरपालिकेच्यास्थायी समिती विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने उमेदवार उभा केल्यामुळे या पदाची निवडणूक बिनविरोध झाली.महाराष्ट्र नगर परिषद,नगरपंचायती,व औद्योगिक नगरी अधिनियम१९६५ चे कलम ६५ सुधारित नियम अधिनियम नगरपरिषदअन्वये सोमवारी नगरपालिकेत स्थायी समिती, विषय समिती सभापती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. नगर पालिकेत अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सदस्य, स्वीकृत सदस्यांची संख्या २० आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोमवारी जानेवारीला विषय समिती सभापती,स्थायी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली,त्यात चार विषय समिती सभापती स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यात त्यात सार्वजनिक बांधकाम विषय समिती सभापती म्हणून सै अहफजुद्दीन सै गायसोद्दीन यांची निवड केली. महिला बालकल्याण विषय समितीच्या सभापतीपदी श्रीमती हमीदाबी हुसेन शाह, स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा विषय समिती सभापतीपदी तुळसाबाई गाडगे यांची निवड केली. 


शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती, उपाध्यक्ष राजू उगले यांनी संयुक्त पत्र देऊन गटनेते काँग्रेसचे सै बुऱ्हाण सै नबी यांची स्थायी समिती सहावे सदस्य म्हणून निवड केली.स्थायी समिती सभापतीपदी पालिकेचे अध्यक्ष या पदसिद्ध सभापतीपदी प्रभाताई कोथळकर आहे. या निवडणुकी दरम्यान एकूण १९ सदस्य हजर होते. एक स्वीकृत सदस्य हे या निवडणुकी दरम्यान गैरहजर होते. 


या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी यांनी काम पाहिले. या वेळी मुख्याधिकारी मिलिंद दारोकार,मो. अफसर शे, सफदर संतोष तेलंगडे यांनी सहकार्य केले. 


शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून, नव्या जोमाने शहराचा विकास करू, असे आश्वासन नवनिर्वाचित सभापतींनी दिले. नवनियुक्त सभापतींकडून दमदार कार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...