आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्यआधारित तांत्रिक शेती, पूरक व्यवसायाची कास धरावी; कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- 'कृषी तंत्रज्ञांनी विदर्भातील प्रत्येक गावापर्यंत प्रगत कृषी तंत्रज्ञान वेळेत पोहोचवत शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक, मानसिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनीही सकारात्मक साथ देत कौशल्याधारित तांत्रिक शेती व पूरक व्यवसायाची कास धरावी, 'असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 


हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या समिती सभागृहात आयोजित 'कृषी दिन' कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. गत वर्षी गुलाबी बोंड अळीच्या अति प्रादुर्भावाने झालेले नुकसान, किडनाशक फवारणी दरम्यान विषबाधेने झालेली जीवितहानी यंदा होणार नाही म्हणून कृषी विद्यापीठाने सुरुवातीपासूनच जाणीव जागृती अभियान राबवले असून कपाशी, धान, सोयाबीन ही महत्वाची पिके लक्षात घेता त्यांचे किडींपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यान्वित करण्याचे दृष्टीने कृषी महाविद्यालये व तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. दिलीप मानकर,यांनी केले तर पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रतिनिधी शेषराव निखाडे, झापू जामूनकर, नासरी चव्हाण, लक्ष्मीबाई पारवेकर यांनी विचार व्यक्त केले. डॉ. विलास खर्चे, डॉ. डी.एम.पंचभाई, प्रा. डॉ. सुधीर वडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सभागृहात मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी सह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यानी तर आभार प्रदर्शन मुख्य संपादक संजीवकुमार सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विस्तार शिक्षण संचालनालयातील डॉ. एन एम काळे, डॉ पी पी चव्हाण, डॉ पी के वाकळे, डॉ. के टी लहरीया, डॉ. सुहास मोरे, प्रशांत पौळकर, मकरंद शिंदे यांनी सहभाग दिला. 


विदर्भातील १५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार 
कृषी दिनाचे औचित्य साधत कृषी विद्यापीठाने रविवारी, १ जुलैला शासनाने गौरवलेल्या विदर्भातील १५ प्रयोगशील शेतकरी बंधू भगिनींचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यात शेषराव निखाडे भंडारा, दत्तात्रय गुंडावार भद्रावती, लक्ष्मीबाई पारवेकर महागाव, चैताली नानोटे (निभारा. ता. बार्शीटाकळी, रवींद्र मेटकर म्हसला जि. अमरावती, सचिन सारडा शिरपूर जैन, शालिग्राम चाफले रेहकी जि. वर्धा, रियाज शेख सरदार कन्नोजे बेसूर जि. नागपूर, अविनाश कहाते रोहणा. ता. आर्वी, झापू जामूनकर रेह्याटखेडा जि. अमरावती, वडू लेकामी मरपल्ली जि. गडचिरोली, पुष्पा खुबाळकर खुबाळा, नागपूर, हिम्मतराव टप्पे कोठारी खुर्द, ता. पातूर, नासरी चव्हाण बोराळा, अकोला,सुधाकर कुबडे सेलू, नागपूर यांचा समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...