आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांचा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांसमोर वाचला पाढा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीजच्या ८४ व्या वार्षिक आमसभेत कॉन्फडरेशन ऑफ ट्रेड 'कॅट' चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी व्यापारी, उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न सभेसमोर मांडले. माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचे याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील आठ राज्यांनी इन्ट्रा स्टेट जीएसटीत सूट दिली असून, राज्यातही तसा निर्णय का होत नाही. पर्यायी व्यवस्था न करता केलेली प्लास्टिक बंदी, शहरातील पाणी प्रश्न मांडला. या वेळी उपस्थितांना त्यांनी त्यांची दखल घेण्यास भाग पाडले.

 

दरम्यान येथून विमानसेवा नित्याने सुरू झाल्यास या भागाच्या विकासाला पंख लागतील. केंद्रीय पातळीवर या दृष्टीने प्रयत्न होत अाहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी या वेळी दिली. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीजच्या ८४ व्या वार्षिक आमसभेत ते बोलत होते. माजी खासदार अजय संचेती, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार शर्मा, आमदार सावरकर, आमदार बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, चेंबरचे अध्यक्ष विजयकुमार पनपालिया, नवनिर्वाचित अध्यक्ष राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल, कासमअली नानजीभाई या वेळी उपस्थित होते.

 

देशाची बदनामी करून काँग्रेसला काय साधायचेय
सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून काँग्रेसी नेत्यांच्या वक्तव्याचे पाकिस्तानात स्वागत होत आहे. देशाची अशी बदनामी करुन काँग्रेसला काय साधायचे आहे, यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमी होण्याची भीती असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या आमसभेनंतर मराठा मंडळ सभागृहात पत्रकारांशी ते बोलत होते. यावरून काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. व्यापारी, उद्योजकांच्या समस्या केंद्रीय पातळीवर संबंधित मंत्र्यांकडे मांडू. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...