आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयकुमार गुप्ता यांचे अहमदाबाद येथे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रिधोरा येथील गुजरात अंबुजा समुहाच्या अंबुजा एक्सपोर्टस््चे संचालक विजयकुमार गुप्ता यांचे बुधवारी अहमदाबाद येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अहमदाबाद येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल स्थानिक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

खडतर परिस्थितीत गुप्ता यांनी अंबुजा   उद्योग समूहाची स्थापना केली. महाराष्ट्र आणि गुजरातसह मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक आदी राज्यातही या उद्योग समूहाचे जाळे विस्तारले आहे. दूरदृष्टी आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी हा उद्योग वाढवला. श्रद्धांजली सभेत त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...