आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजरी येथील विठ्ठल भक्ताचे हृदयविकाराने पंढरपुरात निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या माजरी येथील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री पंढरपुरात घडली. 


बाळापूर तालुक्यातील माजरी येथील सुधाकर राजाराम पारसकर (वय ४७) हे गावातील नागरिकांसोबत रेल्वेने पंढरपूरला गेले होते. मंगळवारी दिवसा दर्शन आटोपून ते रात्री पंढरपुरातील कोकण मठात मुक्कामी होते. तेथे रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता माजरी येथे कुटुंबियांना तत्काळ देण्यात आली. 


बुधवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय तेथे गेल्यावर सुधाकर पारसकर यांचे शव त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पंढरपुरात पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता माजरीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी व बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...