आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर तिसऱ्या, चौथ्या दिवशी हाेणार पाणीपुरवठा; नागरिकांना दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- पाणी टंचाईच्या झळा साेसत असलेल्या अकाेलेकरांना महापालिकेने दिलासा देत तीन दिवसा व चार दिवसा अाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला अाहे. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात अाला अाहे.  


उन्हाळ्यात अकाेलेकरांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्यात लागल्या हाेत्या. अनेक भागात टॅँकरने पुरवठा करण्यात अाला. काही भागातील भूजल पातळी माेठ्या प्रमाणात घटल्याने बाेरींग बंद पडल्या हाेत्या. त्यामुळे अनेकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत हाेते. महान धरणात मार्च ते मे महिन्यात तर धरणातील साठा अत्यल्प झाल्याने पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. लागत होता. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पाणीपुरवठ्यावरील हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवणे आवश्यक होते. सध्या आठवड्यातून एक दिवस शहरात पाणीपुरवठा केला जातो. 


असा अाहे साठा
गत काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अाणि विशेषतः: काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. ११ जुलै राेजी सकाळी ८ वाजेपर्यंत १२.३० टक्के जलसाठा उपलब्ध होता. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बुधवारी दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. 


अशी हाेणार अंमलबजावणी : प्रकल्पातील जल स्तर वाढल्याने रविवार, १५ जुलैपासून दर तीन दिवसानंतर पाणी पुरवठा हाेणार अाहे. यात केशवनगर जलकुंभ परिसर, आदर्श कॉलनी जलकुंभ परिसर, नेहरू पार्क जलकुंभ परिसर, तोष्णीवाल जलकुंभ परिसर, बस स्थानक जलकुंभ परिसर, हरिहर जलकुंभ परिसर, मलकापूर जलकुंभ परिसर, खडकी जलकुंभ परिसर, शिवनी जलकुंभ परिसर, शिवर जलकुंभ परिसर, मोठी उमरी जलकुंभ परिसर, आश्रयनगर जलकुंभ परिसर अादी भागांचा समावेश राहणार अाहे. काही भागात चौथ्या दिवशी पाणी पुरवठा हाेणार अाहे. यात महाजनी जलकुंभ परिसर, रेल्वे स्थानक जलकुंभ परिसर, शिवनगर जलकुंभ परिसरात समावेश हाेणार अाहे. 


...त्यामुळे पाण्याचा दाबही वाढणार 
महानगरात अमृत योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक भागात कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत हाेता. मात्र ही समस्या वर्षभरात कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याचे महापालिका पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...