आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये आजपासून दर दोन ते तीन दिवसांआड होणार पाणीपुरवठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने शहराचे पाणी पुरवठ्याच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे. आठवड्यातून एकदा होणारा पाणी पुरवठा आता काही भागाला दोन तर काही भागाला तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. बदललेले हे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.

दरम्यान या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी पावसाने सरासरी न गाठल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात ५० टक्केही जलसाठा उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पाणी आरक्षणाच्या बैठकीत ६४ खेडी पाणी पुरवठा योजना आणि अकोला शहर पाणी पुरवठा योजनेला पाणी आरक्षित केले होते.

काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून जुलै महिन्या पर्यंत पाणी पुरवठा करता येईल, या हेतुने पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तर दुसरीकडे दरडोई पाणी वाटपातही कपात करण्यात आली. दरडोई, दरदिवशी करण्यात येणारा १०० लिटरचा पाणी पुरवठा थेट ४० लिटरवर आणला. त्यामुळेच काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून शहराची काही प्रमाणात तहान भागवता आली. जुन, जुलै महिन्यात झालेल्या पावसाने काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात हळूहळू का होईना वाढ होत आहे. तूर्तास काटेपूर्णा प्रकल्पात १४ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पात झालेली वाढ लक्षात घेवूनच भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड.धनश्री देव यांनी पाणी पुरवठा तीन ते चार दिवसाआड करण्याची मागणी प्रशासनाला केली होती. महापौर विजय अग्रवाल यांनीही याबाबत पाणी पुरवठा विभागाला सुचना दिल्या. या नंतर पाणी पुरवठा विभागाने दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. या वेळा पत्रकानुसार १५ जुलै पासून शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

या भागाला आज होईल पाणीपुरवठा
१५ जुलै रोजी गाझीया मसजिद परिसर, नवीन तारफैल, लेबर कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी, रामदास पेठ, विक्रम नगर, शेलार फैल, निबंधे नगर, महाजनी प्लॉट, ज्योती नगर, राहुल नगर, शंकर नगर, मोहिते प्लॉट, गजानन पेठ, उत्तरा कॉलनी, प्रसाद कॉलनी, तापडीया नगर, राऊतवाडी, सातव चौक, जठारपेठ, केला प्लॉट, मराठा नगर, श्रावगी प्लाट, किर्ती नगर, स्वावलंबी नगर, व्यंकटेश नगर, बालाजी नगर, विद्या नगर, माधव नगर, रचना कॉलनी, गणेश नगर, सहकार नगर, मित्रशक्ती नगर, कपिला नगर, निवारा कॉलनी, एसबीआय कॉलनी, टिटीएन परिसर, हरिहरपेठ, पोळा चौक, राहुल नगर, तोष्णीवाल ले-आऊट, न्यु भीमनगर, इंदिरा कॉलनी, गिरी नगर, न्यु आळशी प्लॉट, रणपिसे नगर, शास्त्री नगर, देवराव बाबा चाळ, महसूल कॉलनी, महंमदअली रोड, मोमीनपुरा, कामा प्लॉट, अमृतवाडी परिसर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, खडकी, शिवणी, शिवर, उमरी, मलकापूर परिसर आदी भागाला पाणी पुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...