आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनच्या कंत्राटदाराने महिलेला घातला 48 लाखांवर गंडा, पाठवलेल्या गिफ्टच्या आमिषाला पडली बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 54 वर्षीय महिलेची लंडन येथील कंत्राटदारासोबत फेसबूक वरून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर कंत्राटदाराने महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवली व ती सोडवण्यासाठी ४८ लाख ५० हजार रुपये उकळले. अखेर महिलेला आपली फसवणूक होत असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर खदान पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी लंडनच्या कंत्राटदाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

 

प्राजक्ता अनिरुद्ध फणसे ( रा. विजय विद्युत कॉलनी पाण्याचे टाकीजवळ रिंग रोड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राजक्ता यांचा सातव चौकात ड्रेसडिझायनरचा व्यवसाय आहे. एके दिवशी प्राजक्ता यांनी फेसबूकवर एक कविता अपलोड केली. ती कविता बघून व्हीक्शन्य सँम्यूअल नावाच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. प्राजक्ता फणसे यांनी ती एक्सेप्ट केली व फेसबूकच्या माध्यमातून चॅटिग सुरु झाले. मँचेस्टर लंडन येथे काँन्ट्रक्टर असून यूनायटेड नेशन करिता काम करित असल्याचे व्हीक्शन्य सँम्यूअलने सांगितले. या दरम्यान त्याने प्राजक्ता फणसे यांची इत्यंभूत माहिती घेतली. प्राजक्ता यांनी त्याला सर्व खरी माहिती दिली. एवढेच नाही त्याला व्हॉटसअप नंबर दिला. त्यानंतर व्हॉट्सअपवरून मॅसेज येणे जाणे सुरु झाले. २१ फेब्रुवारी रोजी व्हीक्शन्य सँम्यूअलने प्राजक्ता यांच्या घरच्या पत्यावर एक गिफ्ट पाठवले.


सुरुवातीला प्राजक्ता यांनी गिफ्ट घेण्यास नकार दिला. मात्र पुन्हा दोन दिवसांनी प्राजक्ता यांना कुरीअर कंपनीकडून व्हिक्टर सँम्यूअल या नावाने पार्सल आल्याचे सांगण्यात आले. तसेच व्हिक्टर सँम्यूअलने प्राजक्ता यांना फोन करून गिफ्ट स्वीकारण्याची विनवणी केली व वन थाऊझंट यू एस डॉलर भरुन पार्सल सोडविण्याबाबत सांगितले. त्यानंतर प्राजक्ता राजी झाल्या. त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी ६८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. नंतर पार्सल मध्ये एक लाख ५० हजार पाऊंडस् नगदी कॅश व सोन्याचे दागिने असल्याने कस्टमकडून विचारणा होत आहे. त्याकरीता सहा लाख ६८ हजार रुपये दंड भरावा लागेल. त्यावर प्राजक्ता यांनी वेगवेगळ्या अकाऊंटमधून सहा लाख ६८ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवत नाही तोच पुन्हा पार्सलमध्ये असलेली रक्कम १ कोटी ४८ लाख रुपये वाढवून सांगण्यात आली व आयकर विभागाकडे १९ लाख ५० हजार रुपये भरण्याचे सांगितले.अन्यथा गुन्हा दाखल होऊन चौकशीची भीती दाखवण्यात आली. भीतीपोटी प्राजक्ता यांनी वेगवेगळ्या अकाऊंटमधून १८ लाख ४१ हजार रुपये पाठवले. तोच पुन्हा ९ लाख ७४ हजार रुपये व अँन्टी टेरीरीझम सर्टिफीकेटसाठी २५ लाख ८ हजार रुपये दिलेल्या अकाऊंटवर पाठवण्यास सांगितले होते.

 

अनोळखी फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारू नये
फेसबूकरून आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. किंवा त्यांच्याशी संबंध वाढवू नये. व्हॉटसअपवरसुद्धा शहानिशा न करता मॅसेज फॉरवर्ड करू नयेत. याबाबत पोलिस विभागाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सोशलमीडियाचा जागरूकपणे वापर करावा.
- विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक

 

बातम्या आणखी आहेत...