आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांची हंड्यांसह धडक; नळ याेजना रखडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पेटत असून, मंगळवारी बाळापूर तालुक्यातील कवठा येथील महिलांनी पाणी भरण्याच्या हंड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली. पालकमंत्र्यानीही आठवड्यात समस्या मार्गी लावण्याचे अाश्वासन दिले.   गावातील ४ लाखांची मंजूर झालेली तात्पुरती नळ याेजना रखडल्याने पाण्याची समस्या तीव्र झाली . जिल्हाधिकारी अास्तिकुमार पाण्डेय यांनीही ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याबाबत आश्वस्त केले. 


ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र हाेत असून, अनेक ठिकाणच्या बोअरवेल अाटल्या अाहेत. त्यामुळे त्यांना पाणी विकत घ्यावे लागते. पावसाळा सुरु हाेण्यासाठी, प्रकल्पांमध्ये साठा जमा हाेण्यासाठी अवकाश असून, ताे पर्यंत पाण्याची समस्या तीव्र हाेणार अाहे. बाळापूर तालुक्यातील कवठा येथील महिलांनी पाणी समस्या सुटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदन कमलाबाई शेगाेकार, जया पाटील, ताईबाई घ्यारे, देवकाबाई शेगाेकार, सुनंदाबाई इंगळे, चित्राबाई घ्यारे, महानंदाबाई घ्यारे, अन्नपूर्णा घ्यारे, विलास बाेरचाटे, युवराज घ्यारे, चित्रा घ्यारे, सागर घ्यारे, मैनाबाई तायडे, अाशा तायडे, लिला शेगाेकार, पंचफुला शेगाेकार, शीलाबाई सिरसाट अादींनी दिले. 


महत्त्वाचे पदे रिक्त; ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी
कवठा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यात ग्रामसेवक शशी इंगळेंची बदली करण्याची मागणी केली. निवेदनात पुढील मुद्द्यांचा उहापाेह करण्यात अाला अाहे. नदी पात्रातील विहिरीवरून पाणी पुरवठा सुरु हाेता. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याने चार महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद अाहे. पिण्यासाठी पाण्यासाठी महिलांना २-३ कि.मी. अंतर पायपीट करावी लागते. कवठा येथील सरपंच आणि उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने महत्त्वाची पदे रिक्त अाहे. ग्रामसेवक शशी इंगळे दाेन-दाेन महिने गावात येत नाही. परिणामी पुरवठा सुरळीत हाेण्यासाठी उपाय याेजना हाेत नाहीत. पाण्याची समस्या न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात येईल. 


अातापर्यंत जिल्ह्यातील एकूण ६१० बाेअर पडल्या बंद 
प्रशासनाच्या लालफीत शाहीमुळे पाणीटंचाईची समस्या चिघळत असल्याचे दिसून येत अाहे. १०२ बाेअर केल्यानंतर हातपंपासाठीची फाइल मंजूरीसाठी तीन आठवडे लागले हाेते. १५ बाेअरनंतर हातपंप लावताना पाणी पातळी घटल्याने ते बंद पडले. भूजल पातळी घटल्याने ६१० हातपंप बंद पडले अाहे. यंदा ३०१ हात पंप बंद पडले अाहेत. जिल्ह्यात १५ बाेअर केल्या. यात अकाेला व बार्शीटाकळी तेल्हाऱ्यात प्रत्येकी एक, पातूर :५, बाळापूर : ४ , अकाेटच्या ३ बाेअरचा समावेश अाहे. 

बातम्या आणखी आहेत...