आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: तीन वर्षाच्या मुलाला बस स्थानकावर विसरून बस मध्ये बसली आई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देताना आकोट शहर पोलीस. - Divya Marathi
मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देताना आकोट शहर पोलीस.

अकोट- अकोट एसटी स्टँड वर भर दुपारी एक मुस्लिम महिला आपल्या ५ लहान मुलांना घेऊन दर्यापूरला जाण्या साठी बस स्थानक येथे आली असता बस पकडण्या च्या घाई मध्ये ३ वर्षाच्या मुलाला अकोट बस स्थानकावर विसरून बस मध्ये बसली, बस मध्ये गर्दी असल्याने तिच्या लक्षात आले नाही. पण दर्यापूर ला गेल्यावर खाली उतरल्यावर तिच्या लक्षात आले की एक मुलगा दिसत नाही त्या मुळे तिने दर्यापूर बस स्थानका वर शोधले परंतु आढळून न आल्याने तिने दर्यापूर बस स्थानकावर तिने स्पीकर मधून जाहीर सुद्धा केले परंतु मुलगा आढळून आला नाही. 

 

दरम्यान अकोट शहर चे गुन्हे शोध पथकाचे जितेंद्र कातखेडे,राहुल वाघ,नासिर शेख,मंगेश खेडकर हे गस्त करीत असताना त्यांना बस स्थानकाच्या बाहेर एक ३ वर्षाचा लहान मुलगा रडत असताना दिसला त्याची चौकशी केली असता तो काही सांगण्याच्या मानसिकतेत नव्हता व वय लहान असल्याने त्याचे कडून काहीच माहिती न मिळाल्यानेे पोलिस पथकाने त्याचे नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शोध लागत नव्हता. दरम्यान दर्यापूर वरून मुलाच्या आई ने त्यांच्या नातेवाइकाला शोधासाठी पाठवले.पोलिस पथक शोध घेतच होते रडणाऱ्या मुलाची पथकाने समजूत घालून १ तासात त्याचे नातेवाईक आंबोळी वेस येथे राहणारे शेख आसिफ शेख आरिफ यांच्या ताब्यात दिले व रडत असलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलले, मुलगा सुखरूप मिळाल्याने मुलाच्या नातेवाइकांनी अकोट शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...