आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती येथे मारहाणीत जखमी युवकाचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलिस ठाण्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- बँजो पार्टीत वादक युवकाचा अमरावतीतील मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान रविवारी २७ मे ला रात्री मृत्यू झाला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी सोमवारी २८ मे ला मृतदेह शहर पोलिस ठाण्यात आणला. मनोज सुभाष काफफाय, वय २६ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर असे मृतक   युवकाचे नाव आहे. तो ताज बँजो पार्टीत वादकाचे काम करत होता. १० मे रोजी लग्न समारंभासाठी ही पार्टी अमरावती येथे गेली होती. तिथे वाद झाल्यावरून मनोज काफफायला ताज बँजो पार्टीतील वादकांनी मारहाण केल्याचा आरोप मृतक मनोजच्या नातेवाइकांनी केला. मारहाणीत जखमी मनोजला अमरावतीत खासगी दवाखान्यात नेले होते. तिथे त्याचा २७ मे रोजी मृत्यू झाला.मनोजच्या नातेवाइकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी मृतदेह अकोट शहर पोलिस स्टेशनला आणला. त्यामुळे वातावरण चिघळले होते. पोलिसांनी घटनास्थळ अमरावती असल्याने तेथे फिर्याद देण्याची सूचना केली. शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी योग्य तो न्याय देण्यात येईल, असे सांगितले. नातेवाइकांना समजावून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवला. 


आरोपी मोकळे राहीले नसते 
आरोपींनी मृतकाला गंभीर मारहाण केल्यानंतर त्याला अमरावतीजवळ शेतात टाकले. मात्र, नंतर प्रकरण अंगावर येईल, या भीतीने सारवासारवसाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. शासकीय रुग्णालयात नेले असते तर इतर सर्व सोपस्कार झाले असते. त्यामुळे आरोपी मोकळे राहिले नसते. 


युवकाचे कुटुंब पोरके 
मृतकाला चार बहिणी, भाऊ, आई आहे. हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करून तो कुटुंबाचे पालनपोषण करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंब पोरके झाले आहे. आरोपींच्या विरुद्ध कठोर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी नातेवाइकांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...