Home | Maharashtra | Vidarva | Akola | Youth has Power to make changes : said, Former minister Shashikant Shinde

युवकांमध्येच परिवर्तन घडवण्याची शक्ती : माजी मंत्री शशिकांत शिंदे

प्रतिनिधी | Update - Jul 30, 2018, 12:10 PM IST

केंद्र व राज्यातील सरकारने विश्वासार्हता गमावली असून, प्रत्येक समाजघटकामंधील नाराजीचा फटका येणऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताध

 • Youth has Power to make changes : said, Former minister Shashikant Shinde

  अकाेला- केंद्र व राज्यातील सरकारने विश्वासार्हता गमावली असून, प्रत्येक समाजघटकामंधील नाराजीचा फटका येणऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसणार लागणार अाहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी रविवारी भाजपवर टीकास्त्र साेडले. राकँाच सक्षम विराेधी पक्ष असून, युवकांमध्येच परिवर्तानाची शक्ती असल्याचेही शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम विदर्भ विभागीय सक्षमीकरण मेळाव्यात ते बाेलत हाेते.


  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राकाँयुकांचा बुध सक्षमीकरण संकल्प मेळावा मराठा मंगल कार्यालयात अायाेजित करण्यात अाला हाेता. मराठा अारक्षणावरुन झालेल्या उद्रेकावरही माजी मंत्री शिंदे यांनी भाष्य केले. राज्यात उद्रेक सुरु असून, त्याचे खापर मात्र िवराेधकांवर विशेषतः राकाँवर फाेडले जाते. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला भाजपने सत्ता स्थापन हाेण्यापूर्वी अाश्वासन िदले. मात्र अाश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार ठाेस निर्णय घेत नाही. केंद्र व राज्यातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत अाहे. छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे केवळ भूमिपूजन केले. शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची करण्याचे काम सरकार करीत अाहे. स्मारकाची उंची कमी केल्याने छत्रपतींची उंची कमी हाेणार नाही, असेही ते म्हणाले.


  शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर पाकिस्तानात हाेणाऱ्या सत्तापरिवर्तच्यानिमित्ताने टीका केली. विदर्भात पक्ष संघटन वाढवणे कठीण असल्याचेही ते म्हणाले. या वेळी िवचारपीठावर तुकाराम िबडकर, माजी आमदार शरद तसरे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, राजेंद्र शिंगणे, बसवराज पाटील, डाॅ. संतोष कोरपे, श्रीकांत पिसे, डॉ.आशा मिरगे, राजकुमार मुलचंदानी, दिलीप चव्हाण, प्रा. विश्वनाथ कांबळे, राजू बाेचे, युवराज गावंडे, युसूफ अली, बुढन गाडेकर, माे. फजलुउर्र रहेमान, उमेश पाटील, गुड्डू ढाेरे, नितीन मानकर, शेखर बाेंद्रे, वर्षा निकम उपस्थित हाेते. प्रास्तविक रायुकांॅचे िवदर्भ समन्वयक संग्राम गावंडे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी म्हैसने यांनी केले. अाभार रायुकाँचे जिल्हाध्यक्ष महेश सरप यांनी मानले.


  युवकांना संधी द्या : संग्राम काेते
  िवधानसभांसह इतरही निवडणुकांमध्ये युवकांना राकाँने संधी द्यावी, असे अावाहन रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम काेते पाटील यांनी केले. राज्यात ९३ हजार ४०० बुथ अाहेत. बुथची संकल्पना राबवताना ते युवक राकाँच्याच विचारांचे असावेत. शिष्यवृत्ती, कौशल्य विकासाची याेजना कशा कुचकामी ठरत अाहेत, हे जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचे अावाहनही त्यांनी केले.


  मुहुर्तानंतरही पाणी शिरलेच
  यंदाचे विधी मंडळाचे नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनाची सत्ताधाऱ्यांनी मुहूर्त निवडला हाेता. नेहमी साेमवारी सुरु हाेणारे अधिवेशन बुधवारी सुरु झाले. मुहूर्त शाेधूनही सुरु केलेले अधिवेशनात पाण्यात गेले, असा टाेलाही शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विधानभवन परिसर पाण्यात बुडाला हाेता, असेही ते म्हणाले.


  सरकारची चुकीची धाेरणं पाेहाेचवा

  सध्या बेराेजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, केंद्र व राज्य सरकारची चुकीची धाेरणं जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचे अावाहन रायुकाँचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे यांनी केले केले. वन बुथ टेन युथ या संकल्पनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पाेहाेचवा, असेही ते म्हणाले.

Trending