आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलक फाडल्यामुळे वाद; युवकाचा खून, तिघांवर हल्ला, एक जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- वाढदिवसानिमित्त परिसरात लावण्यात अालेले फलक आणि पूर्ववैमनस्यातून तीन युवकांवर पाच युवकांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नेहरू नगरात घडली. या हल्ल्यात निखिल अशोक पळसपगार याचा(वय २०, रा मोठी उमरी) मृत्यू झाला असून, त्याचा माेठी उमरी परिसरात राहणार मित्र विक्की संतोष कपले जखमी झाला. हल्लाप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

 

हल्लाप्रकरणी फत्तेपूरवाडीत राहणाऱ्या अक्षय प्रदीप देशमुख यांनी पोलिसात तक्रार दिली. पूर्ववैमनस्य व वाढदिवसानिमित्त लावण्यात अालेले फलक फाडण्यात अाले. माेठी उमरी परिसरात राहणारे आशिष उर्फ पहिलवान रमेश मोकळकर, रमेश मोकळकर, गणेश समाधान भातुलकर, अंकुश राजेश नेरकर आणि शुभम एकनाथ कोरकणे हे नेहरू नगर येथे आले.

 

त्यांच्यावर अाराेपींनी सशस्त्र हल्ला केला हाेता. याप्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगल घडवणे अादी कारणांवरून गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु अाहे. याप्रकरणी पोलिसांनी अाराेपींना अटक केली अाहे. 


धारदार शस्त्रांचा वापर 
उमरी प्रकरणातील हत्यांकडांत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात अाला. हल्लेखाेरांनी निखिलच्या छातीवर लोखंडी पाइप व धारदार शस्त्रांनी वार केले. गंभीर जखमी झालेल्या निखिलचा मृत्यू झाला. या हल्ल्यात विक्की कपले हा गंभीर जखमी झाला. हल्लेखाेरांनी इतर सहकाऱ्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्याची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विक्की कपले याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरण्यात अाले. पोलिसांनी १५ मार्च राेजी रात्रीच आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. 
 

बातम्या आणखी आहेत...