आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात जमिनीच्या वादातून एकाचा खून; हाणामारीत दोघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जुने शहरातील मारोती नगर परिसरात बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास भूखंडाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या मध्ये शैलेश लढाऊ याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी आहेत.

 

जुने शहरातील बाळापूर नाका परिसरातील मारोती नगर येथे अग्रवाल नामक व्यक्तीची जमीन आहे. कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने जमिनीवरील अतिक्रमण काढले होते. त्यानंतर जागेला लाकडी खांबाचे कुंपण करण्यात आले होते. बुधवारी नागलकर कुटुंबातील सदस्यांनी त्या कुंपणातील लाकडी खांब लावल्याच्या कारणावर दोन्ही गटात वाद झाला. यामध्ये नागलकर कुटुंबाने पहिला वार शैलेश लढाऊ याच्यावर केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अश्विन नवले आणि सागर पूर्णये, राहुल खडसान हे तिघे जखमी झाले. 

 

या प्रकरणात राहुल रमेश खडसान यांच्या तक्रारी वरून शुभम नागलकर, सचिन नागलकर, अक्षय नागलकर, तुषार नागलकर, अमर भगत यांच्यासह अन्यकाही जणांवर खुनाचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर तुषार नागलकर यांच्या फिर्यादीवरून अश्विन नवले, सागर पुरने, शैलेश आढाव, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशिष वानखडे, किशोर वानखडे यांचा विरुद्ध पण भादवी ३०७ कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना गुरुवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...