आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत खळबळ : उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार स्वीकारणारे 2 कर्मचारी निघाले लाचखाेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-शिक्षक िबंदूनामावली प्रक्रिया यशस्वीरित्या राबवल्याबद्दल थेट िजल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत १५ िदवसांपूर्वीच सत्कार स्वीकारणाऱ्या दाेन कर्मचाऱ्यांना मंगळवारी एक हजारांची लाच स्वीकारताना लाचलूचत प्रतिबंधक िवभागाने (एसीबी) रंगेहात अटक केल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या दाेन्ही कर्मचाऱ्यांनी बिंदू नामावलीतील िशक्षिकेला रूजू करुन घेण्यासाठी लाचेची मागणी केली हाेती. कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने िशक्षण िवभागात धाव घेतली.

 

पंचासमक्ष कर्मचाऱ्याने स्वीकारालेल्या नाेटांची पडताळणी व अाेळखपरेड केली. खातरजमा हाेताच दाेन्ही कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले. कैलास वसुदेव मसने (वय-४७ ,रा.मोठी उमरी, असोलकर वाडी,अकाेला, पद पद-वरिष्ठ सहाय्यक) अािण रामप्रकाश आनंदराव गाडगे (वय ५५ वर्षे,रा.गितानागर, अकाेला) अशी एसीबीने अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे अाहेत. 

िजल्हा परिषदेच्या िशक्षण काही िदवसांपूर्वी िशक्षण िवभागाने िबंदुनामावलीचा प्रस्ताव मागासकक्षाला सादर केला हाेता. मात्र कक्षाने कारवाई करुन प्रस्ताव सादर करण्याचा अादेश िदला हाेता. त्यानंतर बिंदूनामावलीचा प्रस्ताव परिपूर्ण हाेण्यासाठी िशक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात अाला. २२ जानेवारी राेजी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या िशक्षकांची िशक्षण विभागाने सेवा समाप्त केली. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील एका िशक्षिकेचाही समावेश हाेता. या कारवाईला िशक्षकांनी िवभागीय अायुक्तांकडे अाव्हान िदले. अायुक्तांनी िशक्षण िवभागाच्या कारवाईला स्थगिती िदली. त्यानंतर संबंिधत िशक्षिकेला पुन्हा रुजू करुन घेण्यासाठी अावश्यक त्या मदतीकरिता िशक्षण िवभागातील त्या दाेन कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत िशक्षिकेच्या पतीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली अािण मंगळवारी सापळा रचत कैलास वसुदेव मसने अाणि रामप्रकाश आनंदराव गाडगे यांना अटक केली. 

 

असा झाला हाेता सत्कार 
शिक्षण िवभागाने बिंदूनामावलीची प्रक्रिया यशस्वीिरत्या राबवल्याने २७ फेब्रुवारी राेजी झालेल्या समितीच्या सभेत अध्यक्षा संध्या वाघाेडे, सभापती पुंडलीराव अबरट यांच्यासह, सीईअाे एस. रामामूर्ती, िशक्षणाधिकारी प्रशांत िदग्रसकर, कर्मचारी रामप्रकाश गाडगे व कैलास मसने यांचा सत्कार करण्यात अाला हाेता. या सत्कारासाठी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी पुढाकार घेतला हाेता. 


गाडगेंची मूळ नेमणूक तर बांधकाम िवभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर असून, त्यांची नियुक्ती बिंदूनामावलीसाठी तात्पुरत्या स्वरुपात िशक्षण िवभागात करण्यात अाली हाेती, हे येथे उल्लेखनीय. या गैरप्रकारामुळे मिनी मंत्रालयात खळबळ उडाली आहे. 
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलूचत प्रतिबंधक िवभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण िवभागात धाव घेतली. पथकाने पंचासमक्ष कर्मचाऱ्याने स्वीकारालेल्या नाेटांची पडताळणी व अाेळखपरेड केली. खातरजमा हाेताच दाेन्ही कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले.

 

अशी केली कारवाई : सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने िशक्षण िवभागात कैलास मसनेकडे पैसे िदले. तत्पूर्वी एसीबीने नाेटांचा क्रमांकासह इतरही मािहती अापल्याजवळ नमूद करुन ठेवली हाेती. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शिक्षण िवभागात धाव घेतली.तक्रारकर्त्याने इशारा केला. एसीबीने साेबत घेतलेल्या महसूल िवभागाच्या पंचासमक्ष संबंधित कर्मचाऱ्याची अाेळखपरेडची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर कर्मचाऱ्याने स्वीकारलेल्या नाेटांच्या क्रमांकाची पडताळणी करण्यात अाली. खातर जमा झाल्यानंतर एसीबीने मसने अािण रामप्रकाश आनंदराव गाडगे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीने पाेिलस अधीक्षक श्रीकांत िधवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय गाेर्ले, पाेिलस िशपाई, सुनील राऊत, संताेष, येलाेणे, प्रवीण अादींनी केली. 

झेडपीमध्ये गत सव्वा वर्षामध्ये एबीसीचे अाठ सापळे; १३ अधिकारी-कर्मचारी जेरबंद 
याेजना राबवण्यात अयशस्वी ठरलेल्या, पाणी पट्टी वसुलीत माघारलेल्या अािण अर्खचित िनधीचा अाकडा वाढतच असलेल्या िजल्हा परिषदेला लाचखाेरीचा कीड लागल्याचे गत सव्वा वर्षातील (सन २०१७ व २०१८ ) अाकडेवारीवर नजर टाकल्यास िदसून येते. एसीबीने या कालावधीत १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली अाहे. यामध्ये प्राची िशरभाते (प्राथमिक अाराेग्य केंद्र, महान), नितीन महादेव दांडगे ( लेखा विभाग), सुरेश भागवत फाेलाणे ( ग्राम विकास अधिकारी, जनुना), अशाेक नारायण घाेपे (ग्राम िवकास अधिकारी, तेल्हारा), श्रीकांत महादेव ठाकरे (िशक्षण िवभाग), दादाराव शांताराम वारके (तलाठी मजलापूर), गट िवकास अधिकारी गजानन वेले यांच्यासह चार जण, िशवकुमार माेरे (पंचायत समिती, अकाेट),दीपाली रामकृष्ण भोंबळे , ग्रामविकास अधिकारी धामणा या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश अाहे. 

 

आता पुढे काय? 
१. सेवा समाप्त रूजू झालेल्या शिक्षिकेला स्थगितीनंतर पुन्हा रूजू करुन घेण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी ते िशक्षणाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे या दाेन कर्मचाऱ्यांनी केवळ स्वत:च्या भरोशावर लाच कशी स्वीकारली, यात अाणखी काेणत्या अधिकाऱ्यांचा वाटा हाेता काय, यासह इतरही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. एसीबी विभागाने तपासामध्ये या प्रश्नांची उत्तरे शाेधण्याची मागणी हाेत अाहे. 
२. सूत्रांनी िदलेल्या मािहतीनुसार याप्रकरणात रूजू करुन घेण्यासाठी यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये देण्यात अाले हाेते. अाता हे पैसे काेणत्या अधिकाऱ्यांना नंतर िमळाले हाेते कि संबंिधत कर्मचाऱ्यांनीच ठेवून घेतले हाेते, या प्रश्नांची उत्तरेही अद्याप िमळालेली नाहीत. जिल्हा परिषदेत लाच स्वीकारणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोण कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे,याचा शोध घेतल्यास वस्तूस्थिती समोर येईल. 

बातम्या आणखी आहेत...