आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देऊळगावराजा हायस्कूलचे ३ विद्यार्थी 'नासा'भेटीस जाणार; अभ्यास दौऱ्यासाठी निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा- येथील देऊळगावराजा राजा हायस्कूलच्या तीन विद्यर्थ्यांची निवड अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारी जागतिक स्तरावरील नामांकित संस्था नासाला भेट देण्यासाठी झाली आहे. त्याबद्दल दि. ५ मार्च रोजी संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात भाग्यवान विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले आहे. येथील देऊळगाव राजा शिक्षण संस्थेद्वारे संचलीत देऊळगावराजा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर विविध शैक्षणिक स्पर्धा बौद्धिक चाचणी परीक्षासह विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे कार्य सातत्याने राबवले जात आहे. त्यामुळे या शाळेतून घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी जगभरामध्ये विविध नामांकित क्षेत्रात आपल्या नेत्रदीपक कार्यकुशलतेचा ठसा उमटावला आहे. 


मानवाला अंतराळात राहण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, याची उत्सुकता आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली यजुचार्या डॉट कॉम या खाजगी कंपनीने १० डिसेंबर २०१७ रोजी घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेमध्ये देऊळगाव राजा हायस्कूलच्या शंतनू राजेंद्र राजे, खुशी नंदन मिश्रीकोटकर व जान्हवी राजेंद्र राजे यानी यश संपादित केले होते. दरम्यान या तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांची अमेरिका येथे नासा केंद्रास बारा दिवसीय भेट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यजुचार्य डॉट कॉमच्या अधिकाऱ्यांनी या बाबतची घोषणा केली आहे. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर धन्नावत, व्यवस्थापक ओमप्रकाश धन्नावत, सचिव सुबोध मिश्रिकोटकर, संचालक अनिल गुप्ता, कंपनीचे प्रतिनिधी वीरेन जैस्वाल, प्रीतम वोरा, स्थानिक विधितज्ञ सतीश नरोडे, मुख्याध्यापक महादेव थोरवे, पत्रकार मुशिरखान कोटकर, मयूर पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन जनार्धन मेहेत्रे यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...