आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
कापाशीवर गुलाबी बाेंड अळीने हल्ला केल्याने शेतकरी उद््ध्वस्त झाला अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डाेंगर अाणखी वाढणार अाहे. बाेंड अळीच्या एकूण ३३ हजार ३८६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १२ हजार ६२१ प्रकरणांची तपासणी झाली अाहे. याबाबत लवकरच सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.
सव्वा लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
गुलाबी बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसाची मदत शासनाकडून मिळण्यासाठीचा अहवाल ६ जानेवारी राेजीच शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. बाेड अळीने हल्ला केल्याने जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ६६८ शेतकरी अडचणीत सापडले असून, एकूण १ लाख ४३ हजार ४८०.८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले अाहे. अाकडेवारीनुसार अपेक्षित निधीची रक्कम १३५ काेटी ५१ लाख ७४ हजार ३३९ पर्यंत पाेहाेचली अाहे. हा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात अाला अाहे. जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ६६८ शेतकरी अाता मदतीच्या प्रतीक्षेत अाहेत.
तीन स्तरावरून मिळेल शेतकऱ्यांना मदत
बाेंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण हेक्टरी ६ हजार ८०० ते ३७ हजार ५०० रुपयांची मदत तीन स्तरावरुन मिळणार अाहे. शासनाकडून (एनडीअारफ) ६ हजार ८०० (काेरडवाहू), बागायतदार शेतकऱ्यांना १३ हजार ५० रुपये मदत मिळणार अाहे. पीक विम्याअंतर्गत ८ हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत बियाणे कंपन्यांकडून १६ हजार नुकसान भरपाई मिळेल. अर्थात परिपूर्ण विमा आणि बियाणे कंपन्यांनी दावा मान्य केल्यावरच ही मदत शेतकऱ्यांना मिळणार अाहे.
परिपूर्ण अहवाल; कृषी विभागाचा लागणार कस
गुलाबी बाेंड अळीने कपाशी नष्ट झाल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील दहिगाव (अवताडे) येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन केले हाेते. प्रार्दूभावानंतर कृषी विभागाने तातडीने पाहणी करणे अावश्यक हाेते. मात्र शेतकऱ्यांसह राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांकडून चाेहाे बाजूंनी मदतीची मागणी झाल्याने आणि हे सर्व घटक अांदाेलनाच्या पवित्र्यात असल्याने प्रशासनाने पाहणी सुरू केली. मात्र बियाणे कंपन्यांकडून मिळणाऱ्या मदतीसाठी अावश्यक असलेल्या तपासणीचा वेग वाढवणे अावश्यक अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.