आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चाय पे चर्चा’ झालेल्या तालुक्यात चार वर्षांत 95 शेतकरी आत्महत्या; मोदींना आश्वासनांचा विसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या वेळी दाभडी येथे अालेल्या नरेंद्र माेदी यांनी शेतातील पिकांची पाहणी केली हाेती. - Divya Marathi
‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या वेळी दाभडी येथे अालेल्या नरेंद्र माेदी यांनी शेतातील पिकांची पाहणी केली हाेती.

आर्णी (जि. यवतमाळ)- यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २० मार्च २०१४ रोजी प्रचारसभेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती. आज त्याला चार वर्षे पूर्ण होत असताना आश्वासनांची पूर्ती तर दूरच, या काळात आर्णी तालुक्यात तब्बल ९५ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. भाजपने सॅटेलाइटद्वारे देशभरातील तब्बल ५०० शहरांत दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ लाइव्ह दाखवली होती. सत्तेत आल्यास उत्पादन खर्च अधिक ५०% नफा, असा हमीभाव, विदर्भात कापसावर प्रक्रिया उद्योग उभारू, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,अशी एकूण १६ आश्वासने मोदींनी दिली हाेती.

 

खासदार राजू शेट्टी यूपीएच्या संपर्कात 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी साेमवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेत यूपीएत सहभागी होण्याचे संकेत दिले. 

 

राज्यभरात झाले अन्नत्याग आंदोलन
१९ मार्च १९८६ ला राज्यातील पहिल्या शेतकरी अात्महत्येच्या स्मरणार्थ साेमवारी शेतकरी संघटनांच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग अांदाेलन करण्यात अाले.


पुढील स्‍लाइडवर पाहा,  अात्महत्यांचे सत्र... 

बातम्या आणखी आहेत...