आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा पाठलाग करत होता तरूण, जाब विचारायला गेलेल्या पतीसोबत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या युवकांच्या मित्रांनी महिलेच्या पतीलाच मारहाण केली. ही घटना मोठी उमरीतील पॅलेस दुकानाजवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणी युवकांविरूद्ध गुन्हे दाखल करून चौकशी सुरु केली. 

 

फत्तेपुरवाडीजवळील एका कॉम्प्लेक्ससमोरच एक दाम्पत्य राहते. त्यांचे मोठी उमरीतील लक्ष्मी नगरात राहणाऱ्या युवकासोबत कौटुंबिक वाद आहेत. यावर पडदा टाकण्यासाठी फिर्यादी व युवकांमध्ये रात्री पावणेअकरा वाजता मोबाइलवर संभाषण झाले. त्यानंतर युवकाने फिर्यादीला मोठ्या उमरीत त्याच्या मित्रांसोबत बोलण्याचे सांगून नंतर येतो असे म्हटले. त्यानुसार फिर्यादी पॅलेस दुकानाजवळ गेला. तेथे तिघे आले होते. त्यांना फिर्यादीने सांगितले की, माझ्या बायकोचा पिच्छा सोडण्याचे तुझ्या मित्रांना सांग. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी तिघांनीही फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने सिव्हिल लाइन्स ठाण्यात तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...