आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांच्या कातडीची वाहतूक, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरगावमंजू - जनावरांची कत्तल करून कातडी मालवाहू गाडीत नेताना वाहतूक पोलिसांनी पकडली. गाडीसह साडे चार लाखांंचे कातडे जप्त करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवारी केली. अवैध जनावरांची कत्तल करून मृत ४६ जनावरांची कातडी किंमत दीड लाख गाडी क्रं. एमएच ०४ डीएस ७६५९ यातून मुख्य मार्गावरून नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार पी. के. काटकर यांच्यासह दीपक कानडे, भागवत कांबळे, प्रवीण वाकोडे, शरद बुंदे यांनी गाडीची झडती घेतली. मृत जनावरांची कातडी मिळाल्याने आरोपी वाहन चालक शे. जुबेर शे. मुन्शी रा. बोरगावमंजू यास अटक केले. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...