आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतमनगरात दोन समुहांमध्ये हाणामारी, पोलिसांच्या सतर्कतेने पुढील टळला अनर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुना आरटीओ ऑफिसजवळील गौतम नगरात दोन समूह रविवारी आमने-सामने आले. त्यात हाणामारी झाली. दोन्ही समुहातील दोन-तीन युवक किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी खदान पोलिस तत्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

 

गेल्या काही दिवसांपासून गौतमनगरातील दोन समुदयात धूसफूस सुरु आहे. गेल्या आठवड्यातसुद्धा दोन गटात वाद झाले होते. त्यातील एका गटाने दुसऱ्या गटाविरुद्ध खदान पोलिसात तक्रारही केली होती. रविवारी एका गटातील काही युवक दारू पिऊन दुसऱ्या गटाला शिविगाळ करू लागले. त्यातून त्यांच्यात तूतू-मैमै झाली. त्यानंतर लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले. कुणीतरी खदान पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटातच खदान पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी दोन्ही गटातील युवकांना ताब्यात घेवून त्यांना पोलिस ठाण्यात नेले. तसेच जेतवन नगरमध्येही पंतग उडवण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. मात्र ताेही लगेच निवळला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

 


दोन्ही गटांची काढली पोलिसांनी समजूत
दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळताच ठाणेदार संतोष महल्ले, पीएसआय असलम खान, नावकर ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही गटांना शांत केले. त्यानंतर दोन्ही गटांतील नागरिकांची बैठक घेवून त्यांची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...