आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर जुगाऱ्यांचा हल्ला- पीएसआय जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर जुगार खेळणाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवार, १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंबोडा रस्त्यावर घडली. या हल्ल्यात ग्रामीण पोस्टेचे उपनिरीक्षक जखमी झाले असून, पोलिस वाहनाचेही नुकसान झालेे आहे. उपनिरीक्षक रुपनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकोट ते आंबोडा या कच्चा रस्त्याने तांड्याच्या मारोती जवळून आंबोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडा खाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.


त्यानुसार पोलिस पथक पंचासह शासकीय जीप क्र. एमएच ३० एच ५०१ घटना स्थळाकडे रवाना झाले. एका झाडाखाली शेतामध्ये बाळू मोतीराम बोडखेसह १० ते १२ जण जुगार खेळत होते. पोलिस पथकाला पाहताच जुगारी पळायला लागले. पोलिसांनी पाठलाग करून बाळू बोडखेला ताब्यात घेतले. हे पाहताच पळून जात असलेले जुगारी परत आलेत. त्यांनी पोलिस पथकावर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक शाहजी रुपनर जखमी झाले. सरकारी जीपच्या काचा फुटल्या. बाळू बोडखेला सोबत घेऊन जुगारी पळून गेले. त्यांनी सोबत नेलेले पंच चंद्रशेखर काशीनाथ झापे यांनाही मारहाण केली.

 

या घटनेची फिर्याद उपनिरीक्षक रुपनर यांनी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून आरोपी बाळू बोडखेसह १० ते १२ जुगाऱ्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरू आहे.

 

हल्लेखोरांवर कडक कारवाई होणारच
पोलिसच नव्हे तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईलच.
- मिलिंद बहाकार, ठाणेदार, ग्रामीण पोलिस स्टेशन, अकोट.

 

बातम्या आणखी आहेत...