आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवानेच चोरले आजीचे २४ तोळे सोने अन् एक किलो चांदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आजीने घरात ठेवलेल्या सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नातवाचे बिंग फुटले. ही घटना मराठा नगरमधील रामधन प्लॉटमध्ये घडली.

 

रामधन प्लॉटमध्ये इंदिरा बापुराव कसूरकार यांचे संयुक्त कुटुंब राहते. ३० डिसेंबर रोजी घरातून २४० ग्रॅम सोन्याचे दागिने एक किलो चांदी व ९० हजार रूपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले. मात्र घरात कोणतीही तोडफोड न होता चोरी झाल्याने घरातीलच कुणीतरी सदस्यावर संशय होता. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी रात्री इंदिरा यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत लिहिले की घरातून २४ तोळे सोने व एक किलो चांदी तसेच ९० हजार रुपये चोरी गेले आहेत.


या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील त्यांनी हाती घेतला तक्रारीनुसार त्यांनी तपासाची सूत्रे फिरवली घरातील प्रत्येक सदस्याची त्यांनी कसून चौकशी केली दरम्यान त्यांचा संशय मुलीचा मुलगा सौरभ जगदीश ढोरे याच्यावर गेला. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी नातू सौरभला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी सौरभ याला १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासदरम्यान सौरवने चोरीच्या ऐवजची विल्हेवाट कशी लावली. याबाबतचे माहिती समोर येणार आहे. ही कारवाई एसडीपीओ उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चंद्रकांत ठोंबरे कर्मचारी शेर अली, संतोष जाधव, रवींद्र सिरसाट, राजू वाकोडे यांनी केली.

 

डीबीवर प्रश्नचिन्ह : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या गुन्ह्याचा तपास कधी एलसीबी करते, तर कधी एसडीपीओंचे पथक करते. काही दिवसांपूर्वी दगडी पुलाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. मात्र, रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या गुन्ह्याची उकलही त्यांना करता आली नाही. अखेर यवतमाळ पोलिसांनी या गुन्ह्याचे धागेदारे लावत गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपींना पकडले. दोनदा सराफा व्यावसायिकाला लुटल्याच्या घटना रेल्वेस्थानकासमोर घडल्या. त्यात दीड कोटी रुपयांचे सोने चोरीला गेले होते. या प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांनी डिटेक्ट केले. तर शनिवारच्या तिसऱ्या घटनेचा तपासही उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या डीबी पथकाने केला. त्यात त्यांनी २४ तासात साडेसात लाख रुपये चोरणाऱ्या युवकाला शोधून काढले. तिन्ही घटनांमध्ये रामदासपेठ पोलिसांचा कोणताही रोल नाही, या घटनांवरून येथील डीबी पथक नेमके करते काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...