आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर खत्री हत्याकांड; जी. श्रीकांत यांची साक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणी तत्कालिन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची साक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी २६ फेब्रुवारीला नोंदवली. एका पोलिस कर्मचाऱ्याचीही साक्ष या वेळी तपासली. सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडली. पुढील सुनावणी १२ व १३ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.

 
३ नोव्हेंबर २०१५ रोजी किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रूपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान उर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या खटल्यात आरोपींच्या वकिलांनी दोन दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणचे पोलिस पाटील किशोर दुतोंडे यांची साक्ष तपासली होती. त्यानंतर ८ जानेवारी रोजी प्रवीण नाकट या युवकाची साक्ष तपासली. 

 

सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची साक्ष नोंदवण्यात आली. आरोपींना दिलेल्या शस्त्र परवान्याबाबत त्यांची साक्ष घेण्यात आली तर पोलिस कर्मचारी गजानन साडे यांनी खुनाच्या घटना स्थळावरील साहित्य नागपूरला न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दोनदा नेले होते. त्याबद्दल त्यांची साक्ष घेण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. वसीम मिर्झा, अॅड. दिलदार खान व अॅड. हातेकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...