आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: भिक्षेकरी बनून भागवत आहे गरजवंतांची भूक; पारिजा भूक फाउंडेशनची धडपड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- अगर ये पेट ना होता तो ये पाप भी ना होता, राजेश खन्नाचा रोटी हा चित्रपट पोटाच्या व्यवस्थेवर गुन्हेगारीचे चित्रण करतो, तर पेट, प्यार और पाप हा जगण्यासाठीची धडपड दाखवतो. आज पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे अनेक लोक विविध ठिकाणी दिसतात. काही वेडसर असतात, तर काहींना घरच्यांनी हाकलून लावलेले असते. अशा विविध अडचणींनी ग्रस्त असलेल्यांच्या पोटाची भूक भागवण्याचे कार्य पारिजा भूक फाउंडेशनच्या माध्यमातून खामगाव शहरात करण्यात येत आहे. अशा ५० गरजवंतांची भूक भागवण्यासाठी भिक्षेकरी बनून संदीप काटोले हे कार्य करत आहे. 


स्थानिक केला नगरातील संदीप काटोले यांच्या आईवडिलांची परिस्थिती जेमतेम होती. एक वेळचे पोटभर अन्न मिळेल की नाही याची शक्यता कमी असायची. भुकेची जाणीव त्यावेळी झाल्याने संदीप काटोले यांनी मित्र मंडळींना एकत्र करून एक उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यातूनच पारिजा भूक फाउंडेशन ही संकल्पना ४ जून रोजी पुढे आली. सर्वच मित्रांना हा उपक्रम पटल्याने सरुवातीला स्वत:च भिक्षेकरी बनून लोकांच्या घरी उरलेले अन्न या गरजूंना वाटप केले. त्यानंतर व्हॉटसअॅपद्वारे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद मिळत गेला व अन्नाची वाढ होत गेली. हे अन्न फरशी जवळील हनुमान मंदिर, शनि मंदिर, रेल्वे स्टेशन, मस्तान चौक, सामान्य रुग्णालय, बसस्थानक आदी परिसरातील वृद्ध भिकारी व गरजूंना नियमितपणे वाटप करण्यात येत आहे. आता ५० ते ६० गरजवंतांची भूक भागेल एवढे अन्न फाउंडेशनकडे लोक स्वत:च आणून देत असल्याचे संदीप काटोले यांनी सांगितले. अन्न वाटपात त्यांना प्रसाद वरणगावकर, शुभम काळुसे, पवन टाले, नवीन बोदडे, चैतन्य वरणबावरक, शुभम रत्नपारखी, रवी पाटील, मुकेश निंबाळकर, राहुल कोल्हे, प्रशांत चव्हाण, योगेश कोल्हे, संतोष गायकवाड, अविनाश ढगे, निखिल सावळे यांच्यासह पाच वर्षाची बालिका सौम्या काटे हिचे सहकार्य लाभते. 


या ठिकाणी स्वीकारले जाते अन्न 
अन्न स्वीकारण्याचे ठिकाण साई मेडिकल घाटपुरी नाका निर्मल टर्निंग जवळ, महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स शिवाजीनगर, योगिराज किराणा गोपाळ नगर, चैतन्य दूध डेअरी केला नगर, रवी पाटील मादन प्लॉट खामगाव येथे आहे, अशी माहिती पारिजा भूक फाउंडेशनतर्फे देण्यात आली. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...