आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • भेंडवळची भविष्यवाणी; यंदा दुष्काळ नाही Prediction Of Bhandwal, Normal Rain In This Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत : यंदा दुष्काळ नाही, पाऊस सर्वसाधारण राहणार; देशाचा राजा कायम, मात्र संकट येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद- यंदा दुष्काळ नसेल, पाऊस सर्वसाधारण राहील. पिकेही सर्वसाधारण राहतील. चारा टंचाई भासणार नाही, तरी शेतकरी मंदीत फसणार आहेत. तसेच देशाचा राजा कायम राहणार असून संकट येणार असल्याचे भाकीत भेंडवळच्या घटमांडणीतील निष्कर्षावरून गुरुवारी वर्तवण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला घटमांडणीची परंपरा आहे. गुरुवारी पहाटे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी घटाची पाहणी केली.

 

काय आहे पीक पाण्याचा अंदाज
कापूस उत्पादन सर्वसाधारण, ज्वारीचे पीक सर्वसाधारण, मात्र भावात तेजी शक्य. बाजरी उत्पादन चांगले, तूर साधारण पीक, मूग साधारण ,पण भाव तेजीत. हरभरा साधारण, उडीद साधारण, तीळ मोघम स्वरूपाचे उत्पादन, वाटाणा सर्वसाधारण उत्पादन, शेतमालाचे बाजार भाव फारसे बदलणार नाहीत. ज्वारीचे भाव वाढतील.

 

आर्थिक स्थिती भक्कम 
घटमांडणीत करंजी, कुरडई, सांडोई ही कायम राहिली. यामुळे कोणतेही संकट देशावर येणार नाही व आर्थिक परिस्थिती भक्कम राहील, असा निष्कर्ष काढण्यात आला.   

 

घटमांडणीला शास्त्रीय आधार नाही : अंिनस
घटमांडणी भाकिताला शास्त्रीय आधार नाही. शेतकऱ्यांनी हवामान खात्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आहे.

 

पावसाचे भाकीत असे
यंदा राज्यात पाऊस सर्वसाधारण राहील. त्यामुळे उत्पादनही सर्वसाधारण राहील. जून महिन्यात साधारण पाऊस, जुलै महिन्यात जूनपेक्षा जास्त पाऊस,ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस, मात्र दुसऱ्या पंधरवड्यात जास्त पाऊस होईल. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी व लहरी राहील. दुष्काळ संभवत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...