आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1,392 बुथवर आज पल्स पोलिओ माेहीम, 1 लाख 89 हजार बालकांसाठी 3,590 कर्मचारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ३७१ बालकांसाठी २८ जानेवारी पल्स पाेलिओ मोहीम राबवण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार ३९२ बुथवर ३ हजार ५९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाेलिअाे मुक्त भारतासाठी शासनाकडून दरवर्षी विशेष माेहीम राबवण्यात येते. सर्वच अाराेग्य व वैद्यकीय यंत्रणा माेहिमेत सहभागी हाेतात. प्रत्येक यंत्रणेकडून अापअापल्या स्तरावर माेहिमेचे नियाेजन करण्यात येते. रविवारी शहरी, ग्रामीण व महापालिका क्षेत्रात मोहीम राबवण्यात येणार अाहे.

 

अशी अाहेत बालके : जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार ३७१ बालकांना पाेलिअाे डाेस पाजण्यात येणार असून, यामध्ये ग्रामीण भागातील १ लाख ७ हजार २९२ बालके, शहरी भागातील (तालुकास्तर) २५ हजार २०० अाणि महापालिका क्षेत्रातील ५६ हजार २६ बालकांचा समावेश राहणार अाहे


सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १ हजार ३९२ बुथवर ही मोहीम सुरू राहील.यामध्ये ग्रामीण क्षेत्रात १ हजार २१, शहरी भागात ११७ आणि मनपा क्षेत्रातील २५४ बुथचा समावेश अाहे. अकाेला शहरात रेल्वे स्टेशन परिसरात ६ तर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात २ बुथची व्यवस्था करण्यात अाली अाहे.

 

असे राहतील कर्मचारी कार्यरत: ग्रामीण, शहरी व मनपा अशा तीन स्तरावर राबवण्यात येणाऱ्या पल्स पाेलिअाे माेहिमेसाठी एकूण ३ हजार ५९० कर्मचारी कार्यरत राहणार असून, यामध्ये शहरी भागातील ३३५ अाणि मनपा क्षेत्रात ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार अाहेत. तसेच महापालिकेतर्फे ५० पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येणार असून, ३० कर्मचारी आकस्मिक सेवेसाठी राखीव पथकामध्ये ठेवले जाणार आहेत. राज्य शासनाच्या अाराेग्य विभागातर्फे २५ पथकांचे गठण करण्यात अाले असून, मोहिमेदरम्यान येणाऱ्या अडचणी पथकांकडून दूर करण्यात येणार अाहेत. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनही दाेन पथक माेहिमेत सहभागी हाेणार अाहेत.

 

येथे हाेईल प्रारंभ
पल्स पाेलिअाे माेहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद, राज्य शासनाचा अाराेग्य विभाग व मनपातर्फे विविध ठिकाणी हाेणार अाहे. जिल्हास्तरीय माेहिमेचा शुभारंभ कान्हेरी येथे येणार अाहे. अाराेग्य विभागातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयात माेहिमेला प्रारंभ हाेणार अाहे. मनपातर्फे डाबकी राेडवरील कस्तुबा गांधी रुग्णालयात माेहिमेचा शुभारंभ हाेणार अाहे. तसेच महापालिकेतर्फे १० ठिकाणीही माेहीम शुभारंभ कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...