आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत अत्याचार; 'चिमणी पाखरं'च्या कथानकासारखी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- परिस्थिती काय दिवस दाखवेल सांगता येत नाही, आई, वडिलांचे निधन झाले. दोघी बहिणी पोरक्या झाल्या. २० वर्षाची थोरली मामाकडे राहील, असे ठरले, तर धाकटी काकाकडे. मात्र मामाने नकार दिला. कुठे राहावे कळेना अशातच ओळखीच्या एका दाम्पत्याने आसरा दिला. धाकटी बहिण तिथे राहू लागली. तिची ओळख सर्वोपचार रुग्णालयात असलेल्या एका युवकाशी झाली. त्याने तिची माहिती काढली व तिच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. आधी नियतीने मारले, आता समाजातील कुप्रवृत्तीने तिचा जगण्याचा मार्गच बंद केला होता. पोलिस ठाण्यात चकरा मारल्या. मात्र बलात्कार कुठे झाला, याबाबत अनेक प्रश्र विचारले. अखेर सोमवारी पीडितेच्या प्रकरणावर मंथन झाले. युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. 


दोघी बहिणी असेलेल्या १५ व २० वर्षीय मुलींच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या राहण्याचा व उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. औरंगाबादला असलेल्या तिच्या काकाने धाकटीचे पालकत्व स्वीकारुन तिला ते घेऊन गेले. थोरलीला मामाकडे राहण्याचा सल्ला दिला. धाकटी काकाकडे गेली तर थोरली मामाकडे. मात्र मामाने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आसऱ्याच्या शोधात असताना तिची ओळख दाम्पत्याशी झाली. त्यांच्याकडे ती राहू लागली. तिचा परिचय सर्वोपचार रुग्णालयात काम करणाऱ्या पवन नामक युवकाशी झाला. त्यांच्यात भेटीगाठी झाल्या. पवनने तिची माहिती काढली. तिच्यासोबत लग्न करून तिला दिलासा देण्याचे वचन दिले. जूनमध्ये तो तिला शेगावला घेऊन गेला. तिथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न तर दूरच त्याने तिची ओळख त्याच्या मित्रांसोबत करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र युवती वेळीच सावरल्याने तिला त्यांच्या विश्वासघाताची चाहूल लागल्याने तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारीचा विचार केला. तिच्या म्हणण्यानुसार तिने पोलिसांशी संपर्क केला मात्र तिच्यावरील शारीरिक अत्याचाराचे ठिकाण शेगाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. सोमवारी यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत करुन युवतीच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्याचे ठरले होते. 


चिमणी पाखरंच्या कथानकासारखी हृदयद्रावक घटना 
आईच्या डोळ्यादेखत मुलांची होणारी वाताहत आणि त्यांना दत्तक देण्याचा प्रसंग चिमणी पाखरं या चित्रपटातील कथानक अनेकांचे डोळे आेले करून गेला होता. असेच एक कथानक सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अनुभवास आले. फरक एवढाच की चित्रपटात मुलांची आई जिवंत होती व काही दिवसांनंतर जग सोडून जाणार होती. मात्र इथे तर युवतीच्या सोबत आई तर नव्हतीच, होती फक्त समाजातील कुप्रवृत्ती. 

बातम्या आणखी आहेत...