आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेनस्नॅचरसह सराफा व्यावसायिकाला तीन दिवस पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- चेनस्नॅचींगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी राम उर्फ सुनील मधुकर गावंडे व गोरक्षण रोडवरील एका सराफा व्यावसायिकाला सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. दोघांनाही रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळ्या चोरणारा आरोपी राम गावंडे याला सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी पकडले. त्याने शुक्रवारी वर्षा चौधरी यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली व ती सोनसाखळी गोरक्षण रोडवरील जितेंद्र विसपुतेला विकल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी अटक केली. शहरामध्ये सर्वाधिक चेनस्नॅचिंगच्या घटना खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. अाराेपीसुद्धा याच हद्दीत राहत असल्याने या परिसरात घडलेल्या घटनांमध्ये त्यांचा हात असल्याची शक्यता असल्याने खदान पोलिसही आरोपीला ताब्यात घेणार आहेत. अाराेपीने सिव्हिल लाइन्स व रामदासपेठच्या हद्दीत चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 


मंगळसूत्र चोरी गेल्याचे दु:ख वेदनादायी 
मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे. हेच मंगळसूत्र तोडल्या जात असेल तर त्याच्या वेदना महिलेलाच माहित. अशा चोरट्यांची गय केली जावू शकत नाही. शहरातील आणखी मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याच्या दिशेने तपास सुरु आहे.
- अनिल जुमळे, ठाणेदार सिटी कोतवाली 

बातम्या आणखी आहेत...