आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Soldier Suicide After Killing Wife And Father in law In Patur

पत्नी, सासरा, स्वत:वरही जवानाने झाडल्या गोळ्या, माळराजुराची थरारक घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर (जि. अकोला) - दिवाळीनिमित्त सुटीवर घरी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाने अापली पत्नी व सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली स्वत:लाही गोळी मारून घेत आत्महत्या केली. ही थरारक घटना पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. छगन प्रल्हाद जाधव (४५) असे या मृत जवानाचे नाव आहे.
दिल्ली येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या छगन जाधवचे वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथील मखराम मेघाजी राठोड (७०) यांची मुलगी सुशीला (४०) हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान, छगन नुकताच दिवाळीनिमित्त त्याच्या गावी माळराजुरा येथे आला होता. साेमवारी सकाळी छगनचे सासरे मखराम राठोड हे अापली मुलगी सुशीला हिला माहेरी मेडशीला घेऊन जाण्यासाठी माळराजुरा येथे आले होते.

सकाळी तिघांनीही चहा घेतला. त्यानंतर गप्पा मारत असतानाच अचानक छगन घरात गेला व त्याने घरातील दुनाली बंदूक आणून पत्नी सुशीला व सासरा मखराम राठोडवर गोळ्या झाडल्या. यामध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर छगनने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्या का केली पत्नी आणि सासऱ्यांची हत्या.... पाहा घटनेशी संबंधित फोटो...