आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल...फक्त एकदा आई म्हण; स्व. रामच्या आईची आर्त हाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे अमर झालेल्या राम मगरची आई मंदाबाईंनी त्याची किडनी घेतलेल्या अब्दुल गणीने आपणास फक्त एकदा आई म्हणावे, अशी हळवी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या या अपेक्षेने उपस्थित सर्वांचे मन हेलावले आहे. तर, याच वेळी रामच्या अवयवदानाचा निर्णय त्याचा मामा सिद्धेश्वर गाडगे यांचा असल्याचेही मंदाबाईंनी सांगितले.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील राम मगर या युवकाचा १२ जानेवारी रोजी अकोला येथून परत येत असताना चांडस फाट्यावरील गतिरोधकावर अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामला १३ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

त्याला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब लावता रामचे मामा सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील सिद्धेश्वर यशवंत गाडगे यांनी रामचे अवयव दान करण्याची कल्पना तेेथील डॉक्टरांसमोर मांडली सिद्धेश्वर गाडगे यांनी भाऊ बद्रीनाथ गाडगे भाचा श्याम मगर यांना आपला निर्णय कळवला. तसेच मंदाबाईंना आपल्याला रामचे अवयव दान करायचे आहेत. आपला राम अवयवरूपी जिवंत राहू दे, असे म्हणत मंदाबाईंची संमतीपत्रावर सही घेतली, अशी माहिती रामची आई मंदाबाईंनी बुधवारी २० जानेवारी रोजी दिली. दरम्यान अवयव दान केल्यानंतर ते अवयव घेणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. मात्र, औरंगाबाद येथील अब्दुल गणी या किडनीच्या रुग्णास रामची किडनी देण्यात आल्याचे कळले. त्यामुळे मंदाबाईंचे मातृत्व जागे झाले असल्याचे दिसून आले.

दरम्यान अब्दुल गणी याने बरे झाल्यानंतर एकदा तरी येऊन आपणास आई म्हणावे, अशी अपेक्षा रामच्या आईने व्यक्त केली आहे. त्यामुळे अब्दुल गणीने रामच्या आईची इच्छा पुर्ण करावी,अशी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त होत आहे.
स्व. रामचे मामा गाडगे
स्व. रामची आई मंदाबाई
अवयवदानाच्या निर्णयासंदर्भात सिद्धेश्वर गाडगे यांना विचारले असता, त्यांनी आपला पुतण्या रवींद्र बद्रीनाथ गाडगे यांची किडनी निकामी झाली होती. त्या वेळचा प्रसंग त्यांनी कथन केला. रवींद्रची किडनी २८ एप्रिल २०१३ ला निकामी झाल्याचे कळले. त्या वेळी कुणी किडनीदाता मिळेल, या आशेत तब्बल एक वर्षाचा काळ गेला, परंतु किडनी मिळाली नाही. शेवटी रवींद्रला त्याची अाई सुमन गाडगे यांची किडनी ऑगस्ट २०१४ रोजी रोपित केली. त्यामुळे अवयवांची रुग्णांना असलेली निकड आपल्याला जाणवली त्या प्रसंगामुळेच अापण अवयवदान करण्यास पुढाकार घेतल्याचे सिद्धेश्वर गाडगे यांनी सांगितले.