आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Mishra Picked Up 400 Kg Weight In Powerlifting Competition In Akola

अभिषेक मिश्राने उचलले 400 किलो वजन, विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा उत्साहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील एक क्षण.)
अकोला- जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या १९ वर्षांआतील अमरावती विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अकोल्याच्या अभिषेक मिश्राने ४०० किलो वजन उचलून नवीन उच्चांक गाठला.
लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावरील भारोत्तोलन प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी, १८ सप्टेंबरला ही स्पर्धा झाली. अद्ययावत तंत्रज्ञान, सामग्री असलेल्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी उद््घाटीय भाषणात केले. स्पर्धेत यजमान अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ येथील ३६ मुलामुलींनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला.
मुलांच्या गटात ५३ किलोगटात यवतमाळचा समाधान चव्हाण, तर ५९ किलोगटात यवतमाळच्याच अविनाश शिंदेने बाजी मारली, तर ६६ किलोगटात मयूर डेंडुले ७४ किलोगटात मयूर क्षार या अमरावतीच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. ८३ किलोगटात अकोल्याच्या अभिषेक मिश्राने, तर ९३ किलोगटात बुलडाणाच्या अमृतपाल मेहराने विजेतेपद मिळवले. १०५ किलोगटात गणेश राठोड, तर १२० किलोगटात प्रणव खुळे या अमरावतीच्या खेळाडूंनी बाजी मारली. तसेच मुलींमध्ये ४३ किलोगटात यवतमाळच्या साक्षी मस्केने, तर ४७ किलोगटात अमरावतीच्या प्रीती देशमुख यांनी विजेतेपद पटकावले.
५२ किलोगटात अमरावतीची प्रतीक्षा कडू विजेती ठरली. ६३ किलोगटात अमरावतीची साक्षी म्हाला, तर ७२ किलोगटात अकोल्याची अदिती गुप्ता यांनी बाजी मारली. ८४ किलोगटात अमरावतीची प्रिती देशमुख, तर ८४ किलोवरील वजनगटात अमरावतीचीच प्रिसेंस वानखडे यांनी विजेतेपद पटकावले. पंच म्हणून प्रणित देशमुख, नीलेश झाडे, राजकुमार तंबोली, पंकज बांबळे, सुशील मोहोड यांनी काम पाहिले. संयोजन कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले.