आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नासच्यावर विद्यार्थ्यांनी दिली पोलिस भरतीपूर्व सराव परीक्षा, पुढील टप्प्यात मैदानावरील चाचण्यांबाबत प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - बेरोजगार युवकांना पोलिस दलातील रोजगाराच्या संधीचे सोने करणे सहज शक्य होण्याच्या दृष्टीने येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या कल्पक नियोजनात मोफत पोलिस भरती प्रशिक्षण शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे. 

उपक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात शुक्रवारी (ता.२७) ५० च्यावर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन करुन त्यांची लेखी सराव परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून शिस्तबद्ध वातावरणात ही सराव परीक्षा झाली. लवकरच पोल भरती होत आहे. त्या दृष्टीने परिसरातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींनी भरतीसाठी सक्षम होण्याच्या उद्देशाने प्रेरित करून या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना मैदानावरील चाचण्यांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परीक्षांसाठी आवश्यक लेखन सामग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. 

पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनात हा उपक्रम सुरु आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचा पोलीस दलातील टक्का वाढावा, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, शासनाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस भरतीत त्यांची निवड मोठ्या प्रमाणात व्हावी, हा या शिबिरांच्या आयोजनाचा उद्देश आहे. केवळ प्रशिक्षण किंवा सरावावर थांबता परीक्षा घेण्यात येतील, त्यामुळे परिणाम साधला जाईल. विद्यार्थ्यांना नोटस् उपलब्ध करुन दिल्या जातील. पोलिसभरती सैन्य भरती तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू असून सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण महिला/पुरुष पात्र आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी वेळेत उमेदवारांची पूर्ण मैदानी चाचणी करुन घेतली जाते. त्यामध्ये लांब उडी, पुलअप्स्‌ धावणे, गोळाफेक इत्यादी क्रीडा प्रकारांचे शास्त्रशद्ध प्रशिक्षण दिले जाते. तसेच लेखी परीक्षा तयारी करुन घेतली जाते. त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमापन, विज्ञान, सामान्यज्ञान हे विषय शिकवले जातात. सदर भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सदर प्रशिक्षणाचा सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलिस, बीएसएफ, कोस्टगार्ड इत्यादी भरतीसाठीसुद्धा उपयोग होतो. 

ग्रामीणटक्का वाढावा: पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरु आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचा पोलीस दलातील टक्का वाढावा, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, पोलिस भरतीत त्यांची निवड मोठ्या प्रमाणात व्हावी, हा या शिबिरांच्या आयोजनाचा उद्देश आहे, असे मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय नितीन पाटील यांनी सांगितले. 
 
प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वी 
प्रशिक्षणाच्या पहिल्याच टप्प्यातील अनुभव प्रत्ययकारी होता. एपीआय नितीन पाटील यांच्याकडून मार्गदर्शन चांगले मिळाले. परीक्षा कडक शिस्तीत झाली. रोजगार उपलब्धीचा आशावाद बळावला. नियमीत प्रशिक्षण पार पडावे, एवढीच अपेक्षा- एक प्रशिक्षणार्थी 
बातम्या आणखी आहेत...