आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाची याचिका काेर्टाने फेटाळली, तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बीएएमएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका नियमानुसार वेळेत ओरिजिनल कागदपत्रे महाविद्यालयात सादर केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालयात निकिता लांडे, रोहन शिरसाट यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. याच दरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या महाविद्यालयातही प्रवेश घेतला होता. परंतु, आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतर या दोन्ही िवद्यार्थ्यांना ओरिजिनल कागदपत्रे सादर करण्याची सूचना महाविद्यालयाने केली.
या दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यानी दुसऱ्या महाविद्यालयातील प्रवेशही मागे घेतला. परंतु, वेळेत कागदपत्रे सादर केल्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. त्यामुळे वर्ष वाया जाऊ नये, ही बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींनाही मध्यस्थी करावयास लावली. अखेर प्रवेश मिळाल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली. न्यायमूर्ती वासंती नाईक आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या बेंचने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वेळेत कागदपत्रे सादर केल्याचा महाविद्यालयाचा दावा ग्राह्य मानून या दोन्ही विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून महाविद्यालयाची भूमिका मान्य केली. याप्रकरणी महाविद्यालयाची बाजू अॅड. आनंद राजन देशपांडे यांनी, तर विद्यार्थ्यांची बाजू अॅड. उज्ज्वल देशपांडे, अॅड. अनुप ढोरे यांनी मांडली.
कागदपत्रे नव्हती

वेळेत ओरिजिनल कागदपत्रे महाविद्यालयात सादर केल्यामुळे नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.