आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलारा फाट्याजवळ अपघातात दोन ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरखेर्डा - भरधाव जाणा-या टाटासुमोने समोरून येणा-या प्रवाशी अॅपेरिक्षाला जबर धडक दिल्याने दोन जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवार, १७ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कोलारा फाट्याजवळ घडली.

सवडद पेनटाकळी येथील दाेन कुटुंब शुक्रवारी अॅपेरिक्षाने (क्रमांक : एमएच २८-आर १७०७) खुपगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून रात्री परत येत असताना कोलारा फाट्याजवळ त्यांच्या अॅपेरिक्षाला समोरून भरधाव येणा-या समाजकल्याण विभागाच्या टाटा सुमाेने जबर धडक दिली. या अपघातात सवडद येथील दत्तात्रय रामभाऊ देशमुख (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना गोपाळराव रामभाऊ देशमुख यांचा मृत्यू झाला. या अपघातात पेनटाकळी येथील तेजराव रामराव इंगळे (वय ५५), प्रतिभा पंजाबराव इंगळे (वय ४०), चालक अनंता प्रल्हाद खरात (वय ३५), सवडद येथील गंगुबाई गोपाळराव देशमुख (वय ३७) गीताबाई दत्तात्रय देशमुख हे पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच अॅपेरिक्षातील जखमींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आत्मानंद थाेरहाते, प्रवीण धनवे, सचीन लाेखंडे, अमोल खेडेकर, दत्ता पैठणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेने चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु सर्वांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी औरंगाबाद येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, औरंगाबाद येथे नेत असताना गोपाळराव देशमुख यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...