आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद कारचालकाने ११ जणांना उडवले, तीन गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मद्यधुंद कारचालकाने भरधाव कार चालवून रस्त्यावरील एकापाठोपाठ क्षणात ११ जणांना उडवले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावर तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती.

एमएच ३० एफ ८०२० क्रमांकाची भरधाव कार ही गजानननगर गल्ली क्रमांक जवळून डाबकी रोडकडे आंबेडकरनगरजवळून जात होती. कारचालक जिल्हा परिषदेचा अभियंता चव्हाण याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एमएच ३० ५३४० क्रमांकाच्या ऑटोला जबर धडक दिली. सुदैवाने या ऑटोमध्ये कुणीही नव्हते. कारने हितेश छांगानी या सालकलस्वारास उडवले. तोसुद्धा रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्यामुळे गंभीर जखमी झाला. त्यानंतर कारने पाणीपुरीच्या गाडीला उडवले. पाणीपुरीवाला बाजूला भांडे धूत असल्यामुळे तो बचावला, तर एकूण ११ जण किरकोळ जखमी झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चेतन कपले, आशिष इंगळे आणि हितेश छांगानी असे जखमींची नावे आहेत.

पोलिस आणि राजकीय दबाव : स्वीफ्टडिझायनर कारचा मालक-चालकाचा एक भाऊ पोलिस खात्यात, तर दुसरा राष्ट्रवादीचा नेता आहे. त्यामुळे रात्री अपघात झाल्यानंतर दोघांनी बचावासाठी मोठी उठाठेव केली. तक्रार करण्यासाठी समोर होणाऱ्यांना यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला रुग्णालयाचा खर्च देऊ, तक्रार करू नका, असे म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उशिरापर्यंत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.

पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज
अपघातझाल्यानंतर जमावाने कारचालकाला मारहाण केली. कारचालकाने पळ काढून स्वत:ची सुटका केली. त्यानंतर जमावाने कारची तोडफोड करत दगडफेक केली. तणावाचे वातावरण झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यावर असलेले अनेक जण या अपघातातून बचावले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.