आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचे टायर फुटून पातुरात अपघात, एक महिला ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - शेगाव येथून दर्शन घेऊन परत जाणाऱ्या जिंतूर येथील भाविकांच्या कारचे टायर फुटून कार क्रेनवर धडकल्याने एक महिला घटनास्थळीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास पातूर ते बाळापूर महामार्गावर घडली. जिंतूर येथील आकाश राजेंद्र रेड्डी, स्मिता राजेंद्र रेड्डी, ज्ञानोबा नरसिंहराव रेड्डी राजेंद्र रेड्डी हे एमएच २२ एनयू ४०६१ क्रमांकाच्या कारने शेगाव येथून दर्शन घेऊन जिंतूरकडे जात असताना पातूर येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाजवळ या कारचे समोरील एक टायर फुटले. त्यानंतर ही कार पातूरकडून बाळापूरकडे जात असलेल्या एमएच २८ टी ५८६४ या क्रमांकाच्या क्रेनला धडकली. या घटनेत स्मिता राजेंद्र रेड्डी घटनास्थळीच ठार झाल्या, तर राजेंद्र रेड्डी, ज्ञानोबा रेड्डी, आकाश रेड्डी, राजेंद्र रेड्डी हे किरकोळ जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार अनिल जुंबळे, वाहतूक पोलिस बाळकृष्ण येवले, एएसआय श्रीकृष्ण पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल गायकवाड, खिरडकर, केशव देवकर, दादाराव अढाऊ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले.