आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याच्या विद्यार्थ्याचा अमरावतीमध्ये मृत्यू, divya marathi,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला येथील रहिवासी शहरात फार्मसीला शिकत असलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याची दुचाकी अमरावती येथील विद्युत भवनसमोर असलेल्या एका खांबावर धडकल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात मंगळवारी २६ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला. रणजित भीमराव चव्हाण (२२ रा. मेन हॉस्पीटल, अकोला) असे मृतकाचे नाव आहे. रणजित हा अमरावती शहरातील एका महाविद्यालयात फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. मंगळवारी सांयकाळी रणजित दुचाकीने (एम. एच. २७ एएच ९१७३) गर्ल्स हायस्कूल चौकातून गाडगेनगरकडे गेला होता. त्याने गाडगेनगरमध्ये मित्राला सोडले तो परत गर्ल्स हायस्कुल चौकाच्या दिशेने परत येत होता. या वेळी पंचवटी चौक ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान त्याची दुचाकी विद्युत भवनसमोर असलेल्या खांबावर जावून धडकली. यात रणजितच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आहे.