आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबलपूर येथे अपघात; गोंदिया जिल्ह्यातील 11 मजूरांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर येथे बुधवारी रात्री तिलवारा घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर ट्रकचा असा चुराडा झाला होता. - Divya Marathi
जबलपूर येथे बुधवारी रात्री तिलवारा घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर ट्रकचा असा चुराडा झाला होता.
 नागपूर- मध्य प्रदेशातील जबलपूर येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव(डव्वा), बोथली घाटबोरी तेली येथील मजूरांचा अपघात होऊन त्यात ११ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्व मजूर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदारसंघातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 
 
गोंदिया जिल्ह्यातील सुमारे २० ते २६ मजूर तेंदुपत्ता तोडण्यासाठी आपल्या गावावरुन जबलपूरला गेले होते. ते गोंदियावरुन जबलपूरला रात्रीला रेल्वेने पोहचले. तिथून वनविभागाच्या गाडीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी चरगंवा येथे जाण्यासाठी निघाले असता वाहनचालकाचे नियत्रंण सुटल्याने पुलाचे रेंलिंग तोडत पुलाखाली नदीत वाहन कोसळले. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. बुधवारी रात्री वाजताच्या सुमारास जबलपूर येथील जमुनिया जवळ तिलवारा घाट येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जबलपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर ११ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला. तर गंभीर जखमींवर अद्यापही उपचार सुरु आहे. घटनास्थळावर १० जणांचा तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तेंदुपत्ता कंत्राटदाराचा वाहनचालक दारुच्या नशेत वाहन चालवित होता. या दरम्यान नरसिंहपुर-गोटेगांव मार्गावरील जामुनिया जवळील एका वळणरस्त्यावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पुलाचे रेलिंग तोडत सरळ खाली पडले. मृतक जखमींच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मध्यप्रदेश सरकारच्यावतीने देण्यात आले असून घटनेनंतर गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. मृतकांमध्ये बुधराम लक्खू (४०), चुन्नीलाल दयाराम चौधरी (३५), लच्छू कुंवरलाल चौधरी (३०), रामनाथ गणपत सरोते (४०), तुलाराम हरिशचंद्र मोयरे (३५), प्रदीप भाऊराव हल्वी (१९), छगन नीलकंठ कामडे (३०), शंकर रामकृष्ण मसकोडे (३५), गनेंद्र तेजराम (३५), टुमेश्वर दयाराम भोयर (४० रा. बोथली), संतू दामा शेंडे (५३ ,रा.बोथली) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बाबूराव चितांमण मेश्राम, नरेश नेतराम भोयर, हरिचंद्र रमेश भोयर, कोंडू गजभिये (सर्व बोथली), विलास नामदेव हल्वी (२९), भुनेश्वर रामदास सोनवाने (४५), भाऊराव सदाराम हल्वी (४५) जयपाल श्रीराम हल्वी (५५), रविंद्र तेजराम हल्वी (२५), भोजराज चिंतामण हल्वी (४०), हरिचंद्र रमेश ठीमर(२२), कालीराम चेम्पू चकटे (४०), हुलीचंद्र दसरू कोलारे (३५), देवाजी कारू मोयर (५०), मारूती अर्जुन कोयरे (४०), चुन्नीलाल लक्ष्मण सिंडे (३२), त्रिमूर्ती अमितन बंसोर (२८) यांचा समावेश आहे. मृतकांत सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील ६, बोथील येथील इतर ठिकाणचे जणांचा समावेश असून त्यांच्यावर त्यांच्यागावी सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सहकाऱ्यांसह मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 
 
बातम्या आणखी आहेत...