आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचारी अपघातात ठार, मालेगावातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- अकोला वाशीम राष्ट्रीय महामार्गावर झोडगाजवळ ट्रॅकर आणि दुचाकीचा अपघात होऊन त्यामध्ये वाशीम येथील पोलिस कर्मचारी विपुल शेळके यांचा मृत्यू झाला. गुरुवार, २३ रोजी दुपारी आपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, विपुल शेळके मोटारसायकल क्रमांक एमएच३७-एम-७५७२ ने जात असताना झोडगा फाट्यावर त्यांच्या वाहनाला पेट्रोल टँकर क्रमांक एमएच२८बी-७१५३ ने उडवले. गंभीर जखमी झाल्याने शेळके यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...