आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची समाेरासमोर धडक, एक जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर- भरधाव दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात धरणगाव येथील माजी पोलिस पाटलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसऱ्या दुचाकीवरील तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल रोजी धुपेश्वर रोडवरील हरसोडा गावाजवळ घडली.

तालुक्यातील धरणगाव येथील माजी पोलिस पाटील अशोक हरिभाऊ इंगळे वय ७२ हे आपल्या दुचाकीने धरणगावहून धुपेश्वरकडे जात होते. हरसोडा गावाजवळ येताच त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एमएच १९ बीव्ही २२४५ या क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे इंगळे हे जखमी झाले. दुसऱ्या दुचाकीवरील गणेश एकनाथ चवरेपगार, आकाश कडू घोळे शांताराम समाधान सुलताने रा. बोदवड हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अॅड. हरीश रावळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, नगरसेवक अनिल गांधी, अरविंद इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खासगी दवाखान्यात भरती केले. परंतु उपचारादरम्यान अशोक इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.