आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वाहनांची धडक, तीन जण झाले जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- डोंगरगाव बस थांब्याजवळ एक प्रवासीवाहू ऑटो मालवाहू ऑटोची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
अकोल्याहून बोरगावमंजूकडे प्रवासी घेऊन येणारा मिनीडोर ऑटो क्रमांक एमएच ३० ९७३४ बोरगावमंजूकडून अकोल्याकडे जाणारा मालवाहू ऑटो क्रमांक एमएच २८ एच ९४०८ यांची धडक झाली. मिनीडोरमधील प्रवासी अ. राजीक रशीद जयप्रकाश शर्मासह चालक मो. शोएब मो. शब्बीर रा. बोरगावमंजू हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मो. शोएबच्या फिर्यादीवरून बोरगावमंजू पोलिसांत मालवाहू गाडीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.