आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगाला तारेचा मांजा, विजेच्या तारेला मांजाच्या स्पर्शाने युवक झाला जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पतंग काटण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. चक्क ३०० रुपये किमतीच्या पतंगाला २० फूट बारीक तार चायनीज मांजा असलेला पतंग काही मुले उडवत होती. अचानक त्या तारेच्या मांजाचा स्पर्श विजेच्या ताराला लागला लघुशंका करत असलेल्या मुलाला त्याचा स्पर्श होताच तो फेकल्या गेला. त्यात तो जखमी झाला. ही घटना मकरसंक्रांतीला सकाळी वाजताच्या सुमारास डाबकी रोडवरील वाल्मीकी चौकात घडली. याप्रकरणी पतंग उडवणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रूपेश जामनिक रा. रावनगर, डाबकी रोड, वय २४ वर्षे असे जखमीचे नाव आहे. शिवनगर येथील प्रमोद प्रकाश चौधरी हा वाल्मीक चौकात त्याच्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. त्यांनी ३०० रुपये किमतीचा भला मोठा पतंग बनवला होता. इतर पतंग काटण्यासाठी त्याने पतंगापासून २० फुटांपर्यंत बारीक तार मांजा म्हणून बांधली होती, त्यानंतर चायनीज मांजा लावण्यात आला होता. पतंग उडवणाऱ्याच्या हातात चायनीज मांजा असल्यामुळे मांजा म्हणून असलेल्या तारेचा स्पर्श जरी झाला, तरी त्याला शॉक लागण्याची भीती नव्हती. काही अंतरावर रूपेश जामनिक लघुशंकेसाठी उभा होता. पतंग उडवता उडवता तो विजेच्या तारांत अडकला आणि त्याचा तारेचा मांजा खाली उभ्या असलेल्या रूपेश जामनिकच्या अंगावर पडला. त्यामुळे विजेचा जोरदार शॉक त्याच्या तोंडाला लागला तो फेकल्या गेला. त्याला रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

एका जणाचा गळा कापला
पत्रिकावाटण्यासाठी नांदुरा येथे जात असलेल्या अकोटफैल येथील शेख. अंजतुम शेख रसूल, वय ५० वर्षे याच्या गळ्याला चायनीज मांजा अडकला त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार करून त्यांनासुद्धा रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मांजावर मनपाकडून कारवाईच नाही
न्यायालयानेजीवघेण्या चायना मांज्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले अाहेत. परंतु, महापालिकेने चायना मांज्या विक्री तपासणीचा फार्स करत या तपासणीत चायना मांज्या विक्रीवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही, तर अस्वच्छतेपोटी २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. आयुक्तांनीही झोन अधिकाऱ्यांना चायना मांज्याची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

परंतु, या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. चारही झोनमध्ये केवळ चायना मांज्या तपासणीचे नाटक केले. चारही झोनमध्ये गुुरुवारी केलेल्या तपासणीत अधिकाऱ्यांना चायना मांज्या आढळून आला नाही, हे विशेष. त्यामुळे या तपासणीत विविध हॉटेल, मटन विक्रेते, किराणा व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दक्षिण झोनमध्ये दहा हजार ५०० रुपये, तर उत्तर झोनमध्ये दहा हजार ९०० रुपये अशी एकूण २१ हजार ४०० रुपयांची दंडात्मक वसुली केली.