आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात "लेखापाल'साठी एकही कर्मचारी सापडेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दोनहजारांपेक्षा अधिक कर्मचारी संख्या असलेल्या महापालिकेला तूर्तास लेखापालाचा प्रभार देण्यासाठी एकही कर्मचारी मिळत नसल्याने लेखापाल होता का हो लेखापाल, अशी म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यावरून लेखापालपदावर काम करण्यास कर्मचारी का तयार होत नाहीत? ही बाब सिद्ध होते.

विविध प्रकारामुळे महापालिकेची मंत्रालयात ‘चांगलीच’ ओळख झाली आहे. परिणामी, अकोल्यात यायला अधिकारी धजावत नाहीत. सर्वच विभाग महत्त्वाचे असले तरी आर्थिक विषयांशी संबंधित विभाग महत्त्वाचे मानले जातात. कारण याच विभागातून देयके काढण्याचे काम केले जाते. त्यातल्या त्यात लेखापाल हे पद अत्यंत महत्त्वाचे. लेखापालपद रिक्त असल्याने या पदाचा प्रभार प्रशासनाला एखाद्या कर्मचा-याकडे सोपवावा लागतो. काही दिवसांपर्यंत हा प्रभार अरुण पाचपोर यांच्याकडे होता. परंतु, अरुण पाचपोर हे त्यांच्या मनाने काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवल्या गेला. प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर स्वत:ला आयुक्तांपेक्षा मोठे समजतात तसेच आयुक्त सोमनाथ शेटे, अरुण पाचपोर यांच्या म्हणण्यानुसारच काम करतात, असा ठपकाही नगरसेवकांनी ठेवला होता. या प्रकारातून अरुण पाचपोर यांना कक्षात कोंडण्याचा प्रकारही घडला. यानंतर हे प्रकरण आयुक्तांसमोर गेले. अखेर आयुक्तांनी प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांच्यावर आयुक्तांची दिशाभूल करण्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर जुलैला निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यांच्या निलंबनानंतर लेखापालाचा प्रभार कोणत्याही इतर अधिका-याकडे सोपवला नाही. त्यामुळे लेखा विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. "दिव्य मराठी'ने या अनुषंगाने जुलैला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत, प्रशासनाने लेखापालाचा प्रभार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. परंतु, कोणताही कर्मचारी लेखापालाचा प्रभार घेण्यास तयार झाल्याने लेखा विभागाचे कामकाज पूर्णपणे ढेपाळले आहे. परिणामी, दोन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असताना प्रशासनावर लेखापाल होता का हो लेखापाल, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पदोन्नतीचाफायदा काय? : महापालिकेतकाही वर्षांपूर्वीच पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात आली. पदोन्नतीच्या वेळी आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप अनेक कर्मचा-यांनी केला. पदोन्नतीमुळे कर्मचा-यांचे अनेक वर्षांपासूनचे सुरू असलेले काम बदलले. परंतु, नव्या कामाची सवय अथवा समजून घेण्याची वृत्ती नसल्याने अनेक कर्मचारी केवळ पदोन्नती घेऊन वेतनात वाढ करून मूळ पदावरच काम करत आहेत. काही कर्मचारी तर आजही शिपाईपदावर काम करत आहेत. पदोन्नती होऊनही प्रभारी लेखापाल मिळत नसल्याने पदोन्नती प्रकरणाचा निपटारा करून महापालिकेला नेमका काय फायदा झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पदाधिका-याचाही नकार
एकीकडेदोन उपलेखापालांनी लेखापालाचा प्रभार घेण्यास लेखी नकार दिल्यानंतर प्रशासनाने मोर्चा एका अनुभवी, अधीक्षक राहिलेल्या संघटनेच्या पदाधिका-याकडे वळवला. परंतु, या वरिष्ठ अधिका-यानेही प्रभार घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रभार कुणाकडे द्यावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन उपलेखापालांचा नकार
लेखापालाचाप्रभार देण्यासाठी प्रशासनाने प्रथम पदोन्नती मिळालेल्या (घेतलेल्या) दोन उपलेखापालांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी नकार दिला. यामुळे आयुक्त सोमनाथ शेटे यांनी त्यांना तसे लिहून द्या, अशी सूचना केली. आयुक्ताच्या या सूचनेला घाबरता या दोन्ही उपलेखापालांनी आयुक्तांना चक्क लेखापालाचा प्रभार नको, असे लेखी दिले.

साध्या लिपिकाचा प्रभार
पदोन्नतीमुळेवरिष्ठ लेखापरीक्षक झालेल्या अधिका-याकडे देयक लिपिकाचा कारभार सोपवण्यात आला आहे. लेखापरीक्षण करणा-या अधिका-याकडे साध्या लिपिकाचा प्रभार सोपवणारी केवळ अकोला महापालिकाच असू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने महापालिकेत सुरू आहे.