आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून घरात फेकले अॅसिड, कुटुंबीयांची पोलिस ठाण्यात धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उमरी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून एका घरामध्ये उघड्या असलेल्या खिडकीतून काही गुंडांनी फरशी पुसण्याचे अॅसिड टाकले. सुदैवाने ते कुणाच्याही अंगावर पडले नाही. मात्र, या घटनेमुळे कुटुंबीय प्रचंड घाबरल्याने त्यांनी मंगळवारी रात्री १०.३० वाजता सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले होते.
उमरी येथे स्मशानभूमीजवळ विवेक वसंतराव गिरी हे राहतात. त्यांच्या घराजवळून जाण्यासाठी काही युवकांनी रस्ता बनवला आहे. ते युवक या रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे विवेक गिरी त्रासून गेले होते. मंगळवारी त्यांची काही युवकांची बोलचाल झाली. त्याचे रूपांतर भांडणात होऊन युवकांनी गिरी यांच्या कुटुंबीयांना धमकावले. त्यामुळे भीतीपोटी विवेक गिरी यांनी मंगळवारी दुपारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवून, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र, तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केलीच कशी म्हणून काही युवकांनी पुन्हा रात्री गिरी यांना धमकावण्याचा आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गिरी कुटुंबीय घरामध्ये असताना त्यांच्या खिडकीतून फरशी पुसण्याचे अॅसिड फेकण्यात आले. त्या अॅसिडमुळे जमीनही उतू आल्याचे गिरी यांनी सांगितले. त्यापैकी अॅसिडचे काही थेंब विवेक गिरी यांचे वडील वसंत गिरी यांच्या हातावर पडले होते. त्यानंतर युवकांच्या दहशतीमुळे विवेक गिरी, वसंता गिरी, त्यांची मुलगी आणि जावई हे सर्व सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी घटनाक्रम पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पोलिसांना पाठवले होते. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.