आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील टवाळखाेर पाेलिसांच्या रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातिजल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक अादेश लागू केला असून, हा अादेश १९ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार अाहे. आगामी परिस्थितीचे संक्षिप्त विश्लेषण करून िजल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे प्रस्तावित केले हाेते. प्रतिबंधात्मक अादेशामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील, अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू बाळगण्यास, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास, दगड किंवा तशी साधने बाळगणे तशी साधने जमा करणे किंवा तयार करता येणार नाही. सुरक्षितता धोक्यात येईल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, सोंग आणणे,पत्ते खेळणे आणि तशी चित्रे, फलके किंवा इतर कोणत्याही वस्तु तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार करणे,पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. मात्र हे अादेश यात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्न सोहळा, सामाजिक सण इत्यादी,शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे, रंगमंच या ठिकाणी लागू हाेणार नाहीत.

धार्मिकउत्सव लक्षात घेता पाेलिस महसूल प्रशासनाने टवाळखाेरांवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या अाहेत. जवळपास ३०० टवाळखाेरांना लवकरच हद्दपार करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. समाजकंटक, देशद्राेही, गुंडांप्रती सहानुभूती बागळण्याची अावश्यकता नाही असे, मत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी अकाेल्यात केले हाेते, हे येथे उल्लेखनीय.

अकाेला जिल्हा हा गृहखात्याच्या लेखी अतिसंवेदनशील अाहे. सर्वच धर्मियांचे सण उत्साहात साजरे करण्यात येतात. प्रत्येक धार्मिक उत्सवांच्या पृष्ठभूमिवर महसूल पाेलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते. गणेशाेत्सव विसर्जन मिरवणूक, बकरी ईद, नवदुर्गा उत्सवाच्या पृष्ठभूमिवर कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण हाेण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टवाळखाेरांची माहिती प्रशासनाने संकलित केली अाहे. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार अाहे.
यापूर्वी१९२ जण हद्दपार : धार्मिकसण, उत्सवांच्या पृष्ठभूमिवर १९२ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली. १८६ जणांना २९ अाॅगस्टपर्यंत, तसेच २५ अाॅगस्टला १० जणांना तीन ते सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात येत असल्याचा अादेश जारी केला हाेता. यामध्ये सतीश रघुनाथ वानखडेला सहा महिन्यांसाठी, िवनाेद वामन ठाेंबरे (सहा महिने), श्रीकांत एकनाथ वैराळे (सहा महिने), शुभम प्रभाकर उमाळे, अंकुश अरुण केवतकर ( सहा महिने), अाकाश दारासिंग राेहेल, संताेष उर्फ गाेट्या रतन गाेंडाले, एजाजखान िमरबाज खान (सहा महिने), सलीम खान अकबर खान, दस्तगीर खान याकुब खान उर्फ िड. के. राजा (सहा महिने) शहजाद खान अारिफ खानला तीन महिन्यांसाठी हद्दपार केले हाेते.
हद्दपार झालेले शहरातच ?
पाेलिसमहसूल प्रशासन टवाळखाेरांना हद्दपार करत असले तरी संबंधित शहरातच फिरत असल्याचा मुद्दा यापूर्वीच्या शांतता समितीच्या सभेत उपस्थित झाला हाेता. त्यामुळे यापूर्वी हद्दपार झालेले कुठे अाहेत, अाता हद्दपारीची कारवाई केलेले पुन्हा शहरात फिरणार नाहीत, यासाठी काेणत्या उपाययाेजना प्रशासनाकडून केल्या जाणार, असे प्रश्न उपस्थित होत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...