आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार धार्मिक स्थळांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिका प्रशासनाने मे रोजी शहरातील चार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. यात तीन दशकांपेक्षा अधिक जुने असलेल्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. ही कारवाई टिळक मार्ग आणि लोखंडी पुल परिसरात करण्यात आली. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रहदारीत अडथळा ठरणारी तसेच अवैध धार्मिक स्थळे हटवण्याची मोहिम महापालिका प्रशासनाकडून सहा ते सात महिन्यापासून राबवण्यात येत आहे. महापालिका निवडणुकी दरम्यान ही मोहिम थांबवण्यात आली होती. त्या नंतर एप्रिल महिन्यात ही मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली. तर मे रोजी पुन्हा ही मोहिम सुरु करण्यात आली. सकाळी पाच वाजता या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. 

शहर कोतवाली समोरील लोखंडी पुला लगत तीन ते चार दशकापूर्वीपासून असलेले शनी मंदिर, शनी मंदिराच्या बाजुने पुलाखाली असलेला दर्गा तसेच टिळक मार्गावरील ४० ते ५० वर्षापूर्वीचे गणपती मंदिर (त्रिविणेश्वर) आणि पिंपळेश्वर मंदिर या मोहिमेत काढण्यात आले. तुर्तास टिळक मार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असुन रस्ता रुंदीकरणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली. तसेच लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचे काम करताना धार्मिक स्थळांचा अडथळा ठरु शकत असल्याने ही धार्मिक स्थळेही हटवण्यात आली. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादुर, जी.एम.पांडे, नगररचना विभागाचे संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, अॅड.इंगोले तसेच अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. 

 
बातम्या आणखी आहेत...